India Pakistan Tension: बिग बींपासून शाहरुख – सलमान पर्यंत साधलं मौन, लोकांचा संताप

India Pakistan Tension: भारत - पाकिस्तनान तणावा दरम्यान बिग बींपासून शाहरुख - सलमान पर्यंत साधलं मौन साधल्यामुळे अनेकांना संताप व्यक्त केलाय..., सतत होत असलेल्या हल्ल्यांमुळे तणावग्रस्त वातावरण

India Pakistan Tension: बिग बींपासून शाहरुख - सलमान पर्यंत साधलं मौन, लोकांचा संताप
ऑपरेश सिंदूर
| Updated on: May 09, 2025 | 5:04 PM

India Pakistan Tension: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटरवर काहीही लिहिलेलं नाही. गेल्या 15 दिवसांपासून बिग बी ब्लँक ट्विट पोस्ट करत आहे. ज्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. तर दुसरीकडे अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी देखील ‘ऑपरेशन सिंदूर’वर एकही पोस्ट केलेली नाही. कायम सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या शाहरुख, सलमान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर मौन साधल्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

 

 

 

ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याबाबत शाहरुख खानने अद्याप सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ज्यामुळे सोशल मीडियावर किंग खानवर जोरदार टीका होत आहे. त्याच वेळी, काही पाकिस्तानी नेटकऱ्यांनी शाहरुख खानचं मौन बाळगल्याबद्दल कौतुक केलं आहे.

एक पाकिस्तानी नेटकरी म्हणाला, ‘तुमच्यासाठी मनात प्रचंड सन्मान आहे. कारण या राजकारणात तू नाहीस. पाकिस्तानी चाहते तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात.’ अन्य एक भारतीय नेटकरी म्हणाला, ‘पहलगाम आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल तुझ्याकडून मौन अपेक्षित नव्हते.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘राहतात भारतात मन मात्र पाकिस्तानात…’

अभिनेता सलमान खान याच्यावर देखील टीका केली आहेच. सलमान खान याने पहलगान येथे झालेल्या हल्ल्यानंतर ट्विट केलं होतं. पण अभिनेत्याने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मौन बाळगलं आहे. यावर एक भारतीय नेटकरी म्हणाला, ‘हिंमत असेल तर पाकिस्तानच्या विरोधात बोलून दाखल…’ असं देखील नेटकरी म्हणाले आहेत.

‘या’ सेलिब्रिटींनी बाळगलं आहे मौन

इतर अनेक स्टार्सनीही ऑपरेशन सिंदूरवर मौन बाळगलं आहे. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या लिस्टमध्ये प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अली फजल, सैफ अली खान, करीना कपूर खान, संजय दत्त, जॅकलीन फर्नांडीज, नुसरत भरुचा यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.