AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खेल खतम, पैसा हजम ?! ट्विटरच्या भूमिकेमुळे बिग बी पडले बुचकळ्यात..

ट्विटरने बऱ्याच जणांचे ब्ल्यू टिक हटवल्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे. बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरला अनोख्या अंदाजात हाक मारत अनेक मजेशीर ट्विट्स केली. सोमवारी पहाटेही त्यांच्या एक ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

खेल खतम, पैसा हजम ?! ट्विटरच्या भूमिकेमुळे बिग बी पडले बुचकळ्यात..
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 24, 2023 | 9:20 AM
Share

मुंबई : अलीकडे सोशल मीडियाच्या जगात ट्विटरवर (Twitter) खळबळ उडाली आहे. मोठ्या व्यक्तींच्या ट्विटर अकाऊंटवरून अचानक ब्लू टिक (blue tick) मार्क हिसकावण्यात आल्याने लोक अस्वस्थ झाले. बॉलीवूड स्टार्सच्या प्रतिक्रियाही आल्या, ज्यांचे ब्लू टिक गायब झाले होते. यामध्ये बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचाही समावेश होता. आता त्यांना ब्लू टिक मार्क परत मिळाले असले तर त्यांनी पहाटे केलेल्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्या टिक मार्कसाठी पैसे दिले होते तेच आता मोफत दिले जात असल्याने अमिताभ यांनी चिंता व्यक्त केली आहे.

खरंतर, याआधी अमिताभ यांनी अनेक मजेदार पोस्ट टाकल्या होत्या. आणि ट्विटरला कधी भैया, कधी मौसी अशी हाक मारत मजेदार पद्धतीने ट्विटरवरून त्यांच्या ब्लू टिक मार्कची मागणी केली होती. काही दिवांसापूर्वी त्यांनी लिहिले की त्यांनी ट्विटरवर ब्लू टिकची रक्कम भरली आहे आणि तरीही त्यांना ब्लू टिक परत मिळत नाही. त्यानंतर लवकरच त्याची मागणीही पूर्ण झाली. पण आता हे प्रकरण थोडे गुंतागुंतीचे झाले आहे कारण आता ज्यांचे 1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यांना ही ब्लू टिक (मार्क) मोफत मिळत आहेत. अशा परिस्थितीत बिग बींनी त्यांचा प्रश्न पुन्हा अनोख्या पद्धतीने व्यक्त केला आहे .

पहाटे पावणेचार वाजता बिग बींनी केले ट्विट

सोमवारी पहाटेपावणेचारच्या सुमारास अमिताभ बच्चन यांनी हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे- ‘ ओ ट्विटर, काकू, मावशी, बहीण, ताई, बुवा, ही तुझी केवढी नावं आहेत! निळं कमळ मिळवण्यासाठी (आधी) पैसे भरायला लावलेत आणि आता (तुम्ही) म्हणता की ज्यांचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत, त्यांना निळं कमळ (ब्लू टिक) फ्री आहे! आमच्याकडे 48.4 दशलक्ष (फॉलोअर्स) आहेत, आता? खेल खतम, पैसा हजम?!’ बिग बी यांच्या या ट्विटवर लोकांनी आपापल्या शैलीत मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

मिठी छूरी नही मिया , नीली छूरी से हुआ हलाल

यावर एका युजरने लिहिले आहे – आता पैसे परत मिळणार नाहीत, हसत हसत फसवले तुम्हाला, कसा गोंधळ झाल, हाय हाय हाय! तर दुसर्‍याने म्हटले आहे – मिठी छूरी नही मिया , नीली छूरी से हुआ हलाल. त्याने बिग बींच्या एका गाण्याचा संदर्भ देत छोरा गंगा किनारे वाल प्रमाणे छोरा 48 मिलियन वाला, असा टोलाही लगावला. तर आणखी एका युजरने हा घाई केल्याचा परिणाम असल्याचे सांगितले. तर काही लोकांनी बिग बींना असेही सांगितले आहे की, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ब्लू टिकसाठी का रडत होता, तुमच्यासारख्यांना असे करणे शोभत नाही.

ब्लू टिक मिळाल्यावर बिग बी झाले होते खुश

यापूर्वी पैसे भरल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक परत आली होती. बिग बींनीही मजेदार शब्दात हे सांगितलं. त्यांची अनेक ट्विट्स खूप व्हायरल झाली होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.