अभिषेकसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान अमिताभ बच्चन यांनी निम्रतसाठी लिहिलेलं पत्र व्हायरल

अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना आऱाध्या ही मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी 'दसवी' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

अभिषेकसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान अमिताभ बच्चन यांनी निम्रतसाठी लिहिलेलं पत्र व्हायरल
निम्रत कौर, अभिषेक बच्चन
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2024 | 3:52 PM

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्यात काही आलबेल नसल्याच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांदरम्यान अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. निम्रत आणि अभिषेकने ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासूनच या दोघांमध्ये अफेअर सुरू झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यावर अद्याप अभिषेक किंवा निम्रतने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अशातच निम्रतच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोमध्ये एक हस्तलिखित पत्र आणि फुलांचा गुच्छ पहायला मिळतोय. निम्रतला हे पत्र अमिताभ बच्चन यांनी पाठवलं होतं. त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात निम्रतसाठी हे पत्र लिहिलं होतं. त्याच पत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत निम्रतने भावना व्यक्त केल्या होत्या.

‘दसवी’ या चित्रपटातील निम्रतचं दमदार अभिनयकौशल्य पाहून बिग बी प्रभावित झाले होतं. म्हणूनच त्यांनी तिला हे पत्र आणि पुष्पगुच्छ पाठवलं होतं. या पत्रात बिग बींनी लिहिलं, ‘आपलं फार क्वचित बोलणं किंवा भेट झाली असेल. कॅडबरीच्या जाहिरातीसाठी मी तुझं YRF च्या कार्यक्रमात कौतुक केलं होतं. तोच आपला शेवटचा संवाद होता. पण दसवी या चित्रपटातील तुझं काम विलक्षण आहे. तुझ्या अभिनयातील बारकावे, हावभाव सर्वकाही उत्तम आहे. यासाठी मी तुझी प्रशंसा करतो आणि तुला शुभेच्छा देतो.’ बिग बींनी 2022 मध्ये हे पत्र लिहिलं होतं.

बिग बींचं हे पत्र इन्स्टाग्रामवर पोस्ट करत निम्रतने कॅप्शनमध्ये लिहिलं, ’18 वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा ही कल्पना करणं की एकेदिवशी अमिताभ बच्चन मला माझ्या नावाने ओळखतील. आमच्या भेटीची आठवण काढतील आणि माझ्या जाहिरातीसाठी माझं कौतुक करतील आणि काही काळानंतर ते मला फुलं पाठवतील, सोबत एक पत्र लिहितील, हे सर्व स्वप्नापेक्षा कमी नाही. कदाचित असं दुसऱ्यांनी माझ्यासाठी स्वप्न पाहिलं असेल, मीसुद्धा नाही. अमिताभ बच्चन सर, तुमचे खूप खूप आभार. आज शब्द आणि भावना दोन्ही कमी पडत आहेत. तुमचं हे स्नेहपूर्ण पत्र आयुष्यभर मला प्रेरणा देईल आणि पुष्पगुच्छाच्या रुपातील तुमच्या मौल्यवान आशीर्वादाचा सुगंध माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात दरवळत राहील. तुम्ही दिलेल्या या शाबासकीनंतर शांतता जाणवतेय. एखाद्या विशाल पर्वत किंवा प्राचीन मंदिरासमोर अशी शांतता जाणवते. तुमची मी सदैव आभारी राहीन.’ निम्रत कौरने शेअर केलेलं हे पत्र व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

नुकतीच निम्रत ही ‘सिटाडेल हनी बनी’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचली होती. यानिमित्त ‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने अप्रत्यक्षपणे स्वत: सिंगल असल्याचं सांगितलं होतं. निम्रतला या मुलाखतीत विचारलं गेलं की, ती सिंगल आहे आणि नेहमी फिरायला जात असते. तर इतर सिंगल मुलींना ती काय सल्ला देईल? यानंतर निम्रत उत्तर देऊ लागते तेव्हाच हा व्हिडीओ संपतो. निम्रत इतर सिंगल मुलींना ट्रॅव्हलविषयी सल्ला देत असते, यावरूनच ती स्वत:ही सिंगल आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.