अमिताभ बच्चन यांना कोरोना लसीचा दुसरा डोस, सोबतच शेअर केला एक खास विनोद

| Updated on: May 16, 2021 | 2:20 PM

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलाय. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता.

अमिताभ बच्चन यांना कोरोना लसीचा दुसरा डोस, सोबतच शेअर केला एक खास विनोद
Amitabh Bachchan Corona Vaccination
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं विविध क्षेत्राला जोरदार हादरे दिले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यातील काहींना या जगाचा निरोप घेतला तर काहीजण कोरोनावर मात करत सुखरुप घरी परतले. या पार्श्वभूमीवर बिग बी अमिताभ बच्चन यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलाय. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी दुसरा डोस घेतल्यानंतर एक फोटो शेअर केला आहे. (Amitabh Bachchan took second dose of Corona vaccine)

कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी मास्क लावल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर संपूर्ण काळजी घेत असल्याचंही यातून दिसून येत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी एक विनोद करण्याचा प्रयत्न केलाय. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, ‘दूसरा भी हो गया, कोविड वाला, क्रिकेट वाला नहीं. सॉरी सॉरी ये बहुत बुरा था’.

मागील वर्षी कोरोना पॉझिटिव्ह

अमिताभ बच्चन यांना गेल्या वर्षी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन, ऐश्वर्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अमिताभ आणि अभिषेक बच्चन तातडीने रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी अमिताभ यांच्या समर्थकांनी मंदिरात पूजा, होमहवन केलं होतं. कोरोनामुक्त झाल्यानंतर अमिताभ यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले होते आणि त्यांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं.

‘अमिताभ बच्चन यांची देणगी परत करा’

दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक समितीने (DSGPC) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडून दोन कोटी रुपयांची देणगी घेतल्यामुळे शीख पंथातील वाद आणखी वाढला आहे. हरियाणा शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती (HSGPC) यांच्यासह विविध शीख संघटनांनी दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी शीख समुदायाची माफी मागावी आणि अमिताभ बच्चन यांनी घेतलेल्या देणगीची रक्कम तातडीने परत करावी, अन्यथा कारवाईला तयार रहाण्याची मागणी केली आहे. शिवाय शीख समुदायाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

महागड्या बाईक्सची आवड पडली महागात, वेगाच्या नादात जॉन अब्राहमने दोघांना उडवलं, वाचा पुढे काय घडलं…

Genelia Deshmukh: मुलाला कोरोनाची लागण; आई म्हणून जेनेलियाला काय वाटलं?; व्हिडीओतून केलं मन मोकळं

Amitabh Bachchan took second dose of Corona vaccine