Amitabh Bachchan | बिग बींनी कोरोनाला हरवलं, अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज

अभिषेक बच्चन यांच्या शरीरात कोरोनाचे काही विषाणू शिल्लक असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. (Amitabh Bachchan Corona Negative)

Amitabh Bachchan | बिग बींनी कोरोनाला हरवलं, अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. नुकतंच अभिनेता अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती केली. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांची सून आणि  अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता अमिताभ बच्चन हेही कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र अद्याप अभिषेक बच्चन यांच्या शरीरात कोरोनाचे काही विषाणू शिल्लक असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. (Amitabh Bachchan Corona Negative)

“माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ते घरी आराम करत आहेत,” असे ट्विट अभिषेक बच्चन यांनी केले आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“मात्र माझ्या शरीरात कोरोनाचे काही विषाणू शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मी लवकरच कोरोनाला हरवून घरी परत येईल,” असे ट्विट अभिषेक बच्चन यांनी केले आहे. (Amitabh Bachchan Corona Negative)

दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांनी कोरोनावर मात केली होती. ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा – ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात, अभिषेक बच्चनचे ट्वीट

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 11 जुलै रोजी रात्री उशिरा समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. दोघी पितापुत्रांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांना 11 जुलै रोजी रात्री मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच 12 जुलै रोजी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या या दोघींमध्येही सुरुवातीला कोरोनाची लक्षणं नसल्याने त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं होतं. मात्र, 17 जुलै रोजी या दोघींना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या : 

ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात, अभिषेक बच्चनचे ट्वीट

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोना

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *