ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात, अभिषेक बच्चनचे ट्वीट

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे (Aishwarya Rai Bachchan and Aaradhya test corona negative).

ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात, अभिषेक बच्चनचे ट्वीट

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे (Aishwarya Rai Bachchan and Aaradhya test corona negative). अभिनेते अभिषेक बच्चन यांनी स्वत: याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अभिषेक बच्चन यांनी ट्विटरवर सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. “आपल्या सर्वांचा आभारी आहे. मी सदैव आपल्या ऋणात राहीन. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट नगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ते घरीच आराम करतील. तर मी आणि माझे वडील सध्या रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहोत”, असं अभिषेक बच्चन यांनी सांगितलं (Aishwarya Rai Bachchan and Aaradhya test corona negative).

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 11 जुलै रोजी रात्री उशिरा समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. दोघी पितापुत्रांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांना 11 जुलै रोजी रात्री मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच 12 जुलै रोजी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या या दोघींमध्येही सुरुवातीला कोरोनाची लक्षणं नसल्याने त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं होतं. मात्र, 17 जुलै रोजी या दोघींना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नानावटी रुग्णालयात दहा दिवस उपचारानंतर आज (27 जुलै) ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *