Genelia Deshmukh: मुलाला कोरोनाची लागण; आई म्हणून जेनेलियाला काय वाटलं?; व्हिडीओतून केलं मन मोकळं

एक महिन्यापूर्वी आपल्या दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाली होती त्यावेळी आपण स्वत:ला आणि त्यांना कसं सांभाळलं हे सांगत तिनं हृदयस्पर्शी व्हिडीओची सुरुवात केली. (Genelia Deshmukh: How did Genelia feel as a mother when her children had a corona?)

Genelia Deshmukh: मुलाला कोरोनाची लागण; आई म्हणून जेनेलियाला काय वाटलं?; व्हिडीओतून केलं मन मोकळं
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 5:41 PM

मुंबई : जगभरात नुकतंच ‘मदर्स डे’ (Mother’s Day) साजरा करण्यात आला, यावेळी प्रत्येकाने आपल्या आईबद्दल काही खास गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या. सोमवारी अभिनेत्री जेनेलियानं ‘मदर्स डे’ (Genelia Deshmukh) निमित्त इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली. यावेळी तिनं कोरोनाशी लढण्यासाठी सगळ्यांना हिंमत दिली. सोबतच आपल्या मुलांना सांभाळण्याचा सल्ला देखील दिला.

दोन्ही मुलांना कोरोनाची लागण

एक महिन्यापूर्वी आपल्या दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाली होती त्यावेळी आपण स्वत:ला आणि त्यांना कसं सांभाळलं हे सांगत तिनं हृदयस्पर्शी व्हिडीओची सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

मुलांना मास्क वापरायला शिकवा त्यांची काळजी घ्या

ती पुढे म्हणाली, कालच जेव्हा माझ्या मुलांनी मला येऊन ‘मदर्स डे’साठी मिठी मारली, तेव्हा मी मनातून विचार केला की त्या सर्व माता आणि मुलं ज्यांना कोरोनाची लागण झालीये ते हा दिवस साजरा करू शकत नाहीत. मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या मुलांना मास्क वापरायला शिकवा, सॅनिटाइझेशन करायला शिकवा. सुरक्षित राहा. आपण सगळे या युद्धात एकमेकांसोबत आहोत. माझ्या मुलांना कोरोनाची लागण झाली तेव्हा मला ही त्रास झाली. चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा कुठलीही लक्षणं नव्हती आणि ते लवकर बरे झाले.’

व्हिडीओमध्ये तिनं सर्व मातांना खंबीर आणि सुरक्षित राहण्यास सांगितलं. सोबतच सगळ्यांनी लस घ्या असं आवाहनही केलं. नुकतंच जेनेलियानं लस घेतली आणि चाहत्यांनाही लस घेण्याचं आवाहन केलं.

जेनेलियाची मदर्स डे स्पेशल इन्स्टाग्राम पोस्ट

“मातांमध्ये आपल्या मुलांसाठी नि:स्वार्थपणे आणि स्वतःला झोकून देऊन जगण्याची आश्चर्यकारक क्षमता असते. मुलांना ते स्वत: पालक होईपर्यंत त्याची जाणीवही नसते. हे 24 गुणिले 7 चालणारं असं काम आहे, ज्यात कुठलीही विश्रांती नाही, सुट्टी नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात कमी कृतज्ञता किंवा गृहित धरण्याची वृत्ती” याकडे जेनेलियाने लक्ष वेधलं.

“प्रिय आई, प्रिय मम्मा.. तुमच्याशिवाय मी काय केलं असतं, मला समजत नाही. आणि मला ते जाणूनही घ्यायचं नाही. मी तुमच्याशिवाय कामच करु शकत नाही. तुम्ही तो खांदा आहात, ज्यावर मी कधीही डोकं टेकू शकते. मला माहित आहे, मी तुम्हाला हे फार वेळा सांगितलं नसेन, पण मला तुम्हाला इतकंच सांगायचंय, की आय लव्ह यू आणि तुमच्यासाठी मी देवाचे रोज आभार मानते”

अभिनेत्री जेनेलिया देशमुखच्या इन्स्टाग्राम पोस्टवर तिच्या जाऊबाई दीपशीखा देशमुख यांनीही सो क्यूट अशी कमेंट केली आहे. त्याला जेनेलियाने लाईक करत आभार मानले आहेत. जेनेलिया दरवर्षी मदर्स डे निमित्त वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपल्या आई आणि सासूबाईंचे ऋण व्यक्त करत असते.

संबंधित बातम्या

Lookalike : कतरिनासारख्या दिसणाऱ्या एलिनाला पाहिलंत का?, सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ

Photo : ‘तारक मेहता’फेम टप्पूवर दुःखाचा डोंगर, अभिनेता भव्या गांधीच्या वडिलांचे कोरोनाने निधन

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.