Photo : ‘तारक मेहता’फेम टप्पूवर दुःखाचा डोंगर, अभिनेता भव्या गांधीच्या वडिलांचे कोरोनाने निधन

अभिनेता भव्या गांधीच्या डोक्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ('Tarak Mehta' fame actor Bhavya Gandhi's father dies due to corona)

1/6
Bhavya Gandhi
सध्या देशभरात कोरोनानं डोकं वर काढलं आहे.अनेकांचा कोरोनामुळे जीव गेलाय. अशात आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील टप्पू अर्थात भव्या गांधीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
2/6
Bhavvya Gandhi
अभिनेता भव्या गांधीच्या डोक्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.
3/6
Bhavvya Gandhi
भव्या गांधीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. रिपोर्ट्सनुसार, गेल्या 10 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. भव्या गांधीचे वडील विनोद गांधी एक व्यावसायिक होते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी अचानक कमी झाली, ज्यामुळे त्याचा मंगळवारी मृत्यू झाला.
4/6
Bhavvya Gandhi
'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम भव्या गांधीच्या वडिलांनी कोकिला बेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भव्यासाठी हा खूप कठीण काळ आहे. भव्या त्याच्या वडिलांशी खूप क्लोज होता. फादर्स डेला त्यानं वडिलांसोबत फोटो शेअर केला होता.
5/6
Bhavvya Gandhi
भव्या गांधी सध्या टेलिव्हिजनच्या दुनियेपासून लांब आहे. तो गुजराती चित्रपटांमध्ये काम करतोय. त्यानं गेली अनेक वर्ष टिपेंद्र लाल गाडा ऊर्फ टप्पूची व्यक्तिरेखा साकारली होती. 2017 मध्ये त्यानं 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिका सोडली. शो सोडताना त्याने सांगितलं की त्याची ग्रोथ थांबली आहे. काही नवीन करायला मिळत नसल्यानं त्याने शो सोडला.
6/6
Bhavvya Gandhi
भव्या गांधीचा आजही त्याच्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या सहकलाकारांसोबत चांगला बॉन्ड आहे. तो 'दया बेन' च्या अगदी जवळ आहे. त्याचबरोबर तो दिलीप जोशी आणि साम शहा यांच्याही अगदी जवळचा आहे. कोरोनानं बर्‍याच कलाकारांचा जीव घेतला. त्याच वेळी, अनेकांच्या कुटुंबातील अनेक सदस्य मरण पावले आहेत. कोरोनामुळे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील बर्‍याच लोकांचं आयुष्य बदलले आहे.