स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिका संपल्यानंतरच निवृत्ती : अमोल कोल्हे

स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिका संपल्यानंतरच निवृत्ती : अमोल कोल्हे

मनमाड : स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेतून छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी निवृत्ती घेण्याची घोषणा केल्याचं वृत्त समोर आलं. पण संभाजी राजेंची भूमिका साकारणार असून मालिका पूर्ण झाल्यानंतर मालिका विश्वातून काही काळासाठी निवृत्ती घेणार असल्याचं ते म्हणाले.  मालेगाव येथे  सयाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात अमोल कोल्हे बोलत होते. अमोल कोल्हेंनी नुकताच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अमोल कोल्हे हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची उमेदवारीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून जवळपास निश्चित मानली जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचा अंदाज लावतोय. स्वराज्य रक्षक संभाजी राजे या मालिकेतून अमोल कोल्हे घराघरात पोहोचले आहेत. मालिकेतील त्यांची भूमिका अत्यंत लोकप्रिय आहे.

अमोल कोल्हेंच्या उमेदवारीला शिरुरमध्ये विरोध

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *