AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लग्न झालं तर उद्याच होईल नाहीतर…’, १२ पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न झाल्यानंतर अनिल कपूर यांच्या पत्नीने कसा घेतला बदला

११ वर्ष डेट केल्यानंतर अनिल कपूर आणि सुनीता भवनानी अडकले विवाहबंधनात,लग्नानंतर अनिल कपूर यांनी असं काय केलं ज्यामुळे पत्नी सुनीता भवनानी हनीमूनसाठी एकट्याच गेल्या, त्यानंतर...

'लग्न झालं तर उद्याच होईल नाहीतर...', १२ पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न झाल्यानंतर अनिल कपूर यांच्या पत्नीने कसा घेतला बदला
'लग्न झालं तर उद्याच होईल नाहीतर...', १२ पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न झाल्यानंतर अनिल कपूर यांच्या पत्नीने कसा घेतला बदला
| Updated on: Feb 01, 2023 | 10:34 AM
Share

Anil Kapoor Love story : अभिनेते अनिल कपूर हे बॉलिवूडच्या एव्हरग्रीन कलाकारांपैकी एक आहेत. आज देखील अनिल कपूर त्यांच्या भन्नाट अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकतात. गेल्या अनेक वर्षांपासून अनिल कपूर चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. अनिल कपूर यांचा बॉलिवूड मधील प्रवास जितका रोमांचक आहे, त्यापेक्षाही खास त्यांची लव्ह स्टोरी आहे. सुनीता भवनानी (Sunita Bhavnani) यांच्या प्रेमात पडल्यानंतर अनिल कपूर यांनी त्यांच्यासोबत लग्न कसं केलं? याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे आज अनिल कपूर आणि पत्नी सुनीता भवनानी यांच्या लव्हस्टोरीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेवू.

अनिल कपूर आणि सुनीता भवनानी यांनी एकमेकांना तब्बल ११ वर्ष डेट केलं. अनिल कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मित्राने सांगितल्यानंतर त्यांनी सुनीता यांना प्रँक कॉल केला. फोनवर सुनिता यांचं इंग्रजी भाषेवर असलेलं प्रभुत्व ऐकून अनिल कपूर सुनीता यांच्या प्रेमात पडले. एका प्रँक कॉलनंतर त्यांच्या भेटी वाढल्या आणि भेटींचं रुपांतर प्रेमात झालं.

अनिल कपूर यांना सुनीता यांच्यासोबतच लग्न करायचं होतं. पण तेव्हा बॉलिवूडमध्ये त्यांचा हवा तसा दबदबा नव्हता. तर दुसरीकडे सुनीता या श्रीमंत कुटुंबातील होत्या. अनिल कपूर यांनी अनेकदा सुनीता यांना लग्नाची मागणी घातली. पण समोरुन सतत नकार येत होता. अशात सुनीता यांचे कुटुंबिय देखील नाराज होते. पण जेव्हा ‘मेरी जंग’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर लग्न करायच असं अनिल यांनी ठरवलं.

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनिल कपूर सुनीता यांच्या घरी गेले आणि म्हणाले, ‘लग्न होईल तर उद्याच होईल, नाहीतर कधीही होणार नाही…’ सुनीता देखील अनिल कपूर यांच्यावर प्रेम करत होत्या. अनिक कपूर यांच्या ठाम भूमिकेनंतर १९८४ मध्ये फक्त १२ पाहुण्यांच्या उपस्थितीत सुनिता आणि अनिल कपूर यांचं लग्न झालं.

पण लग्न झाल्यानंतर सुनीता पती अनिल यांच्यावर प्रचंड नाराज होत्या. लग्नानंतर सुनीता यांना हनीमूनसाठी जायचं होतं. पण अनिल कपूर यांना अनेक सिनेमांचं शुटिंग करायचं होतं. म्हणून लग्नानंतर अनिल कपूर त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून सुनीता यांना वेळ देवू शकल्या नाहीत. म्हणून नाराज झालेल्या सुनीता भवनानी हनीमूनसाठी गेल्या.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?