AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankita Lokhande | ‘अंकिता, तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं’; ‘पवित्र रिश्ता’च्या व्हिडीओमुळे सुशांतच्या चाहत्यांनी व्यक्त केला राग

या मालिकेत अंकिताने अर्चनाची तर सुशांतने मानवची भूमिका साकारली होती. त्यावेळी ही मालिका खूप लोकप्रिय ठरली होती. यात मालिकेच्या सेटवर अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर ते डेट करू लागले होते.

Ankita Lokhande | 'अंकिता, तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं'; 'पवित्र रिश्ता'च्या व्हिडीओमुळे सुशांतच्या चाहत्यांनी व्यक्त केला राग
Sushant and Ankita in Pavitra RishtaImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 01, 2023 | 11:42 AM
Share

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. या मालिकेला आज (1 जून) 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त अंकिताने इन्स्टाग्राम व्हिडीओवर खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने भलीमोठी पोस्ट लिहित निर्माती एकता कपूरचे आभार मानले आहेत. या मालिकेत अंकिताने अर्चनाची तर सुशांतने मानवची भूमिका साकारली होती. त्यावेळी ही मालिका खूप लोकप्रिय ठरली होती. यात मालिकेच्या सेटवर अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर ते डेट करू लागले होते.

अंकिताची पोस्ट-

अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेतील तिच्या फोटोंचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘पवित्र रिश्ता या मालिकेला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत, मात्र आजही ही मालिका नवीकोरी वाटते. त्या सर्व गोष्टींसाठी खूप खूप धन्यवाद. एकता कपूर तुमचेही आभार, कारण मी मालिकेत अर्चूची भूमिका साकारू शकेन असा विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवलात. अर्चना ही नवी ओळख मला दिल्याबद्दल धन्यवाद. कारण ज्या लोकांनी मालिका सुरू असताना माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला, ती लोकं आज जेव्हा मला भेटतात किंवा बघतात तेव्हा त्यांच्या तोंडी अर्चू हेच नाव आधी येतं. हे नाव ऐकून मला खूपच भारी वाटतं. पवित्र रिश्ता ही मालिका ज्यांनी मनापासून पाहिली आणि त्यावर प्रेमाचा वर्षाव केला त्यांचे खूप खूप आभार.’

अंकिताला ‘ती’ चूक महागात

मात्र या व्हिडीओतील एक गोष्ट सुशांतच्या चाहत्यांना खटकली आणि त्यावरूनच कमेंट बॉक्समध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली. ती गोष्ट म्हणजे अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेबद्दलच्या व्हिडीओमध्ये सुशांतचा एकही फोटो लावला नाही. ‘जर मानवला दाखवायचंच नव्हतं, तर पवित्र रिश्तासाठी पोस्टसुद्धा लिहायला पाहिजे नव्हती’, असा राग एकाने व्यक्त केला. तर ‘सुशांतचे पण फोटो टाकले असते तर छान वाटलं असतं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘आम्हाला सुशांतची खूप आठवण येते. पवित्र रिश्ता ही मालिका फक्त अर्चनाची नव्हती तर मानवचीही तेवढीच होती’, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे. ‘सुशांतला विसरलीस. तो नाही तर त्याचा एकही फोटो टाकला नाही. अंकिता, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’, अशा शब्दांत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

पहा व्हिडीओ

14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या मुंबईतल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. सुशांत आणि अंकिताने जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. ब्रेकअपनंतर अंकिताने विकी जैनशी लग्न केलं. तर निधनाच्या काही दिवस आधी सुशांत हा अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत होता, अशी चर्चा होती.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.