AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ankita Lokhande | अंकिता लोखंडे मालामाल, ‘बिग बॉस 17’साठी तब्बल इतकी फिस, लोक हैराण

अंकिता लोखंडे हिने एक अत्यंत मोठा काळ हा टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. अंकिता लोखंडे हिने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या. अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Ankita Lokhande | अंकिता लोखंडे मालामाल, 'बिग बॉस 17'साठी तब्बल इतकी फिस, लोक हैराण
| Updated on: Oct 05, 2023 | 9:12 PM
Share

मुंबई : बिग बॉस 17 हे सध्या तूफान चर्चेत आहे. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस ओटीटी 2 चा फिनाले पार पडलाय. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss Ott 2) चा विजेता ठरला. बिग बॉस 17 बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरताना दिसतंय. बिग बॉस 17 बद्दलच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांच्या नजरा बघायला मिळतायंत. बिग बॉस 17 मध्ये अनेक टीव्हीचे मोठे चेहरा सहभागी होणार आहेत.

इतकेच नाही तर पाकिस्तानमधून नेपाळ मार्गे भारतामध्ये दाखल झालेली सीमा हैदर ही सचिन मीना याच्यासोबत सहभागी होणार असल्याची देखील चर्चा आहे. सीमा हैदर हिने काही दिवसांपूर्वीच खुलासा केला की, मला बिग बॉस 17 ची आॅफर आलीये. मी बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार की नाही, याबद्दल मी पुढील काही दिवसांमध्ये खुलासा करेल.

टीव्ही अभिनेत्री आणि बऱ्याच बाॅलिवूड चित्रपटामध्ये धमाका करणारी अंकिता लोखंडे ही देखील बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणार असल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. फक्त अंकिता लोखंडे हिच नाही तर अंकिता हिच्यासोबत तिचा पती विकी जैन हा देखील बिग बाॅसच्या घरात धमाका करताना दिसेल.

बिग बॉस 17 मध्ये सहभागी होण्यासाठी अंकिता लोखंडे हिने तगडी फिस घेतलीये. बिग बॉस 17 मधील सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांपैकी अंकिता लोखंडे ही सर्वाधिक फिस घेणारी स्पर्धेक असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. एका आठवड्यासाठी अंकिता लोखंडे ही तब्बल 10 ते 15 लाख रूपये फिस घेणार आहे.

अंकिता लोखंडे हिच्या फिसबद्दल खुलासा करण्यात आलाय, मात्र तिचा पती विकी जैन हा किती फिस घेणार याबद्दल काही माहिती अजूनही पुढे नाही आली. अंकिता लोखंडे हिच्यासोबत  बिग बॉस 17 मध्ये ऐश्वर्या शर्मा ही देखील आपल्या पतीसोबत सहभागी होणार असल्याचे सांगितले जातंय. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या शर्मा ही खतरो के खिलाडीमध्ये जबरदस्त स्टंट करताना दिसली.

बिग बॉस 16 चे सीजन हिट ठरल्याने निर्मात्यांना या सीजनकडून मोठ्या अपेक्षा नक्कीच आहेत. बिग बॉस 16 मध्ये एक खरी मैत्री शेवटच्या दिवसापर्यंत बघायला मिळाली. बिग बॉस 16 ने टीआरपीमध्ये मोठा धमाका केला. साजिद खान बिग बॉस 16 मध्ये सहभागी झाल्यानंतर सुरूवातीला बिग बाॅसच्या निर्मात्यांवर मोठी टिका करण्यात आली.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.