Kirron Kher | ‘ती लढवय्यी आहे…लवकर बरी होईल’, अनुपम खेरकडून पत्नी किरणच्या तब्येतीची माहिती

| Updated on: Apr 01, 2021 | 1:51 PM

बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडमधील खासदार किरण खेर (Kirron Kher) या रक्ताच्या कर्करोगाने (Blood Cancer) त्रस्त असून, मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Kirron Kher | ‘ती लढवय्यी आहे...लवकर बरी होईल’, अनुपम खेरकडून पत्नी किरणच्या तब्येतीची माहिती
अनुपम खेर आणि किरण खेर
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडमधील खासदार किरण खेर (Kirron Kher) या रक्ताच्या कर्करोगाने (Blood Cancer) त्रस्त असून, मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही माहिती त्यांच्या भाजपच्या एका सहकाऱ्याने दिली आहे. किरण खेर मल्टीपल मायलोमा आजाराने ग्रस्त आहेत, जो रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे (Anupam Kher confirms that his wife actress Kirron Kher Suffering from blood cancer).

1973मध्ये ‘असर प्यार दा’ या पंजाबी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या किरण खेर यांच्याबद्दल हे वृत्त ऐकताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. किरण खेर या चंदिगडच्या भाजप खासदार आहेत आणि त्या सध्या रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. किरण खेरवर सध्या मुंबईत उपचार सुरू आहेत. किरण खेर अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या पत्नी आहेत.

‘ती लढवय्या आहे…लवकर बरी होईल’ : अनुपम खेर

अनुपम खेर यांनी पत्नी किरण खेर यांच्या तब्येतीची माहिती देताना ट्विटरवर सांगितले की, ‘किरण खेरला रक्ताचा कर्करोग झाला आहे.’ अनुपम खेर यांनी पुढे लिहिले की, ‘ही अफवा पसरलेले नाही, म्हणून मला आणि सिकंदरला हे सांगायचे आहे की किरण मल्टिपल मायलोमा या एक प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. तिच्यावर आत्ताच उपचार सुरू झाले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की, ती यापेक्षा पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान होईल. किरणच्या उपचारांसाठी डॉक्टरांची एक चांगली टीम आम्हाला मिळाली हे आमचे भाग्य आहे, ती नेहमी लढवय्यी होती आणि नेहमी लढत राहील.’

‘किरणच्या हृदयात नेहमीच प्रेम असते आणि म्हणूनच लोक तिच्यावर खूप प्रेम करतात. तुम्ही तुमच्या प्रार्थना आणि किरणबद्दलचं प्रेम व्यक्त करत आहात. ती आता ठीक आहे आणि रिकव्हर होत आहे, आम्ही आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल कृतज्ञ आहोत.’ अशी पोस्ट अनुपम खेर यांनी लिहिली आहे.

पाहा अनुपम खेर यांची पोस्ट

किरण खेर यांना कर्करोगाची लागण

31मार्च रोजी प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी खासदार किरण खेर यांच्या अनुपस्थितीवरुन काँग्रेसने केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि यावेळी ते म्हणाले की, किरण खेर या कर्करोगाने ग्रस्त असल्याने, अनुपस्थित आहेत. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

खासदार किरण खेर या सध्या रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त असून, मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, म्हणूनच पुढचे काही दिवस त्या शहरात (चंदीगड) येऊ शकणार नाहीत, असे भाजप प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे. तथापि, आता त्यांची प्रकृती अधिक स्थिर असल्याचेही सूद यांनी म्हटले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये किरण चंदीगडमध्ये होत्या आणि त्या लोकांना मदत करत होत्या. इतकेच नव्हे तर, नोव्हेंबरमध्ये जेव्हा त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, त्यानंतर त्यांच्यावर चंदीगड येथे उपचार सुरू झाले आणि त्याच वेळी तपासणी दरम्यान त्यांना मल्टिपल मायलोमा नावाचा आजार असल्याचेही आढळले. यानंतर, त्या उपचारासाठी मुंबईला रवाना झाल्या. या आजारावर उपचार घेण्यासाठी त्यांना सतत हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे. खासदार किरण खेर यांची प्रकृती आता चांगली असल्याचे सूद यांनी सांगितले.

(Anupam Kher confirms that his wife actress Kirron Kher Suffering from blood cancer)

हेही वाचा :

Kirti Kulhari | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय…’, ‘उरी’ फेम अभिनेत्री होणार पतीपासून विभक्त!

Rashmika Mandanna | रश्मिकाने गुपचूप उरकला साखरपुडा? बोटातील अंगठी पाहून चाहत्यांमध्ये कुजबुज…