Kirti Kulhari | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय…’, ‘उरी’ फेम अभिनेत्री होणार पतीपासून विभक्त!

Kirti Kulhari | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय...’, ‘उरी’ फेम अभिनेत्री होणार पतीपासून विभक्त!
कीर्ती कुल्हारी

‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ फेम अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने (Kirti Kulhari)  पती साहिल सहगलपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना ही माहिती दिली आहे.

Harshada Bhirvandekar

|

Apr 01, 2021 | 1:24 PM

मुंबई : ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ फेम अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने (Kirti Kulhari)  पती साहिल सहगलपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना ही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, ती आता पती साहिलपासून विभक्त होत आहे. कीर्तीच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे (Uri fame actress Kirti Kulhari getting divorced from husband sahil sehgal).

कीर्तीने 2016मध्ये साहिल सहगलशी लग्न केले होते. दोघेही बर्‍याचदा सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसले होते. परंतु, आता कीर्तीने तिच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तिचा हा टोकाचा निर्णय ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सोशल मीडियाद्वारे केले जाहीर

कीर्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात लिहिले आहे की, ‘मी आणि माझे पती साहिल यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे मला सर्वांना सांगायचे आहे. आम्ही केवळ कागदावर नव्हे तर संपूर्ण आयुष्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कोणाबरोबर राहणे म्हणजे त्यापासून विभक्त होणे अधिक कठीण निर्णय आहे.’

कीर्तीने पुढे लिहिले आहे की, ‘जे आता आहे ते बदलता येत नाही. अशा परिस्थितीत, माझी काळजी वाटणाऱ्या सर्वांना मी सांगू इच्छिते की मी ठीक आहे. यानंतर मी यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य करणार नाही’, अशा प्रकारे, कीर्तीने तिच्या भावना लपवण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

पाहा कीर्तीची पोस्ट

 (Uri fame actress Kirti Kulhari getting divorced from husband sahil sehgal)

कीर्ती आणि साहिलचे लव्हमॅरेज!

एकत्र काम करत असताना कीर्ती आणि साहिलचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. दोघे एका जाहिरातीमध्ये एकत्र काम करत होते आणि येथूनच त्यांचे प्रेम सुरू झाले. दोघांनी फार काल एकमेकांना डेट केले नाही, जवळपास दोन महिने डेटिंग केल्यानंतर कीर्तीने साहिलला लग्नासाठी प्रपोज केले आणि अखेर 2016मध्ये या दोघांनी लग्न केले होते.

मीडियाचा अभ्यास करणार्‍या कीर्तिने 2010मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खिचडी द मूव्ही’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती परमिंदरच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय कीर्तीने ‘शैतान’, ‘पिंक’, ‘इंदू सरकार’, ‘ब्लॅकमेल’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘मिशन मंगल’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर, कीर्ती ‘फोर मोर शॉट प्लीज’ आणि ‘क्रिमिनल जस्टिस’ या सारख्या वेब सीरीजमध्येही झळकली होती.

(Uri fame actress Kirti Kulhari getting divorced from husband sahil sehgal)

हेही वाचा :

Rashmika Mandanna | रश्मिकाने गुपचूप उरकला साखरपुडा? बोटातील अंगठी पाहून चाहत्यांमध्ये कुजबुज…

Kirron Kher | बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांना रक्ताचा कर्करोग, मुंबईत उपचार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें