Anupan Kher :अभिनेता अनुपम खेरने आईला काय पितेय विचारताच आईने उत्तर दिलेले शराब शराब…. ;video viral

अनुपम खेर यांनी भाऊ राजू खेरच्या वाढदिवसानिमित्त असा एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते दबक्या आवाजात आईला विचारतायत कि ती काय पितेय? त्यावर आईने दिलेल्या उत्तरांला चाहत्यांकडून चांगलीच पंसती मिळत आहेत

Anupan Kher :अभिनेता अनुपम खेरने आईला काय पितेय विचारताच आईने उत्तर दिलेले शराब शराब.... ;video viral
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 12, 2022 | 12:49 PM

अभिनेता अनुपम खेर(Anupam Kher) अनेकदा त्यांच्या आईसोबतचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. सोशल मीडियावर (Social media )पोस्ट केलेल्या त्यांच्या व्हिडिओला युझर्सकडूनही चांगलीच पंसती मिळते. नुकताच अनुपम खेर व्हिडिओ पोस्ट केला आहे जो चाहत्यांना खूपच आवडला आहे. बऱ्याच दिवसांनंतर अनुपम खेर यांनी भाऊ राजू खेरच्या वाढदिवसानिमित्त असा एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते दबक्या आवाजात आईला (Mother) विचारतायत कि ती काय पितेय? त्यावर आईने दिलेल्या उत्तरांला चाहत्यांकडून चांगलीच पंसती मिळत आहेत.

अनुपम खेर यांनी सोशल मीडिया वर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये ते आईला विचारत आहेत, की आई तू काय पीत आहेस? यानंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आई आपल्या मुलासोबत तिच्या ग्लास चेयर करताना दिसून येत आहेत. अनुपम खेर यांनी पुन्हा आईला विचारले – तुम्ही काय पीत आहात? तेव्हा आई कुजबूत म्हणते शराब.. त्यानंतर आई अनुपम खेर यांना म्हणते मी काय तुला  घाबरतेय का?

 

पिओ पिओ ऐश करो

पिओ पिओ ऐश करो आईच्या या उत्तरावर अनुपम म्हणताना दिसून आले आहेत. या व्हिडीओ सोबत अनुपम खेर यांनी मजेशीर कॅप्शन दिली आहे. ते म्हणतात की आज राजू खेर यांच्या वाढदिवसानिमित्त जेवण करताना मी माझ्या आईला विचारले की ती काय पीत आहे? त्याचं उत्तर ऐकून मी घाबरलो , मात्र तुम्हीही हसाल. आनंद घ्या.’ यासोबतच अनुपम खेर यांनी भाऊ राजूच्या वाढदिवसाचा केक कापतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आई वाढदिवसादिवशी मुलावर कसा प्रेमाचा वर्षाव करत आहे. अनुपम खेर यांच्या आईचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडतो. काही युजर्सने लिहिले आहे – ती ज्या पद्धतीने शराब म्हणत आहे, ते खूप क्युट आहे.दुसऱ्या युझर्सने लिहिले आहे कि, माताजी किती छान आहेत, आणखी एका युझरने अनुपम खेरचे कौतुक केरत म्हटले आहे. सर जी, तुम्ही मनाने खूप चांगले आहात.वर्क फ्रंटवर, अनुपम खेर नुकतेच ‘कार्तिकेय 2’ मध्ये दिसले होते. या चित्रपटातील त्याची भूमिका छोटी होती, मात्र त्यासाठी त्याला खूप प्रशंसा मिळत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ‘द काश्मीर फाइल्स’ हा बॉलीवूड चित्रपट सुपरहिट ठरला होता, ज्यामध्ये अनुपम खेर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.