AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Kapoor | सोनम कपूर हिला बसला धक्का, अनिल कपूर यांना मोठा झटका, चाहते हैराण

अनिल कपूर यांनी एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. अनिल कपूर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनिल कपूरहे सोशल मीडियावर सक्रिय असतात.

Anil Kapoor | सोनम कपूर हिला बसला धक्का, अनिल कपूर यांना मोठा झटका, चाहते हैराण
| Updated on: Oct 20, 2023 | 4:50 PM
Share

मुंबई : अनिल कपूर यांनी एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा आता अॅनिमल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटामध्ये अनिल कपूर हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा मुख्य भूमिकेत असणार आहे. अनिल कपूर हे काही दिवसांपूर्वीच द नाइट मॅनेजर या वेब सीरिजमध्ये दिसले. विशेष म्हणजे या वेब सीरिजला प्रेक्षकांनी उदंड असला प्रतिसाद हा नक्कीच दिलाय.

या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना अनिल कपूर दिसले. अनिल कपूर हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतात. अनिल कपूर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील अनिल कपूर हे दिसतात. अनिल कपूर हे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

आता नुकताच अनिल कपूर यांचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. इतकेच नाही तर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय. अनिल कपूर हे नेहमीच पोस्ट शेअर करतात. मात्र, नुकताच अनिल कपूर यांच्या सर्व पोस्ट इंस्टाग्राम अकाऊंटवरून डिलीट करण्यात आल्या आहेत. इतकेच नाहीतर त्यांचा फोटो देखील काढण्यात आलाय.

हा सर्व प्रकार पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. एकही पोस्ट अनिल कपूर यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिसत नाहीये. मात्र, अनिल कपूर यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील पोस्ट त्यांनीच डिलीट केल्या की, त्यांचे अकाऊंट हॅक झाले, याबद्दल फार काही माहिती ही कळू शकली नाहीये. मात्र, सर्वचजण हैराण झाले.

विशेष म्हणजे अनिल कपूर यांची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिला देखील या प्रकारानंतर धक्का बसल्याचे दिसतंय. सोनम कपूर हिने एक स्क्रीनशॉट शेअर करत थेट डॅड!!?? असे लिहिले. सोनम कपूर हिच्या पोस्टवरून हे दिसतंय की, अनिल कपूर यांना देखील याबद्दल माहिती नाहीये. अनिल कपूर यांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची जोरदार चर्चा आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?