
AR Rahman-Saira Banu Divorce: भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए आर रेहमान आणि सायरा बानू यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्वत्र एर आर रेहमान यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. खुद्द ए आर रेहमान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, प्रसिद्ध घटस्फोट वकील वंदना शाह यांनी दोघांच्या नात्याबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे.
ए आर रेहमान आणि सायरा बानू यांचा घटस्फोट झाला नसल्याचं वक्तव्य वंदना शाह यांनी केलं आहे. वंदना शाह म्हणाल्या की, सामान्य लोकांप्रमाणेच प्रसिद्ध लोकांच्या घटस्फोटाची कारणेही सारखीच असतात. रहमान आणि सायरा बानू यांच्या वेगळे होण्याच्या निर्णयामागील कारण विचारले असता त्यांनी गोपनीयतेचा हवाला दिला. दोघांमध्ये काहीतरी घडले असावे, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला, असे त्या म्हणाले.
वंदना शाह म्हणाल्या, ‘अद्याप घटस्फोट झालेला नाही दोघे अद्यापही विवाहित आहेत. दोघे त्यांच्यामध्ये असलेले मतभेद दूर करु शकलेले नाहीत. निवेदन जारी करत आम्ही दोघांमध्ये काही मतभेद आहेत आणि ते मिटले जाऊ शकत नाहीत…. असं म्हटलं होतं. घटस्फोट झाला आहे असा उल्लेख कुठेच करण्यात आलेला नाही… घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाली आहे….’ असं देखील वंदना शाह म्हणाल्या…
ए आर रेहमान आणि गिटारिस्ट मोहिनी यांच्या घटस्फोटाची बातमी एकाच दिवशी समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आलं. शिवाय नको त्या चर्चांनी देखील जोर धरला. शाह म्हणाल्या, ‘गिटारिस्ट मोहिनी हिचं ए आर रेहमान घटस्फोट प्रकरणाशी काहीही संबंध नाही. सायरा आणि मिस्टर रेहमान यांनी दोघांनी स्वतः घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे…’ सध्या सर्वत्र ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.