
दबंग स्टार, अभिनेता सलमान खान आणि त्याचं कुटुंब नेहमी चर्चेत असतं. सलमानचे (Salman Khan) लाखो चाहते असून भाईजानच्या प्रत्येक कामाची ते वाट पहात असतात. त्याच्याप्रमाणेच अरबाज, सोहेलही चर्चेत असतात. अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) याच्या ‘काल त्रिघोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला, जो लोकांना खूप आवडलाय. अरबाजने त्याचं प्रमोशनही सुरू केलं आहे. मात्र या चिकत्रपटाच्या ट्रेल लाँचवेळी सर्वांना अरबाजचं रौद्र रूप पहायला मिळालं. कारण या इव्हेंटमध्ये सलमान खानचं नाव ऐकताच अरबाज प्रचंड भडकला. सलमानवरून प्रश्न विचारणाऱ्या रिपोर्टवर तो तुटून पडला. त्याने थेट शब्दांत रिपोर्टरला सुनावत त्याची बोलती बंद केली.
“काल त्रिघोरी” च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान, एका पत्रकाराने चित्रपटाव्यतिरिक्त प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आणि सलमान आणि त्याच्या कुटुंबाी ंबंधित प्रश्न अरबाजला विचारला. मात्र सलमानचं नाव येताच अरबाजल ते आवडलं नाही आणि त्याने त्या पत्रकाराला सडेतोड उत्तर दिलं.
अरबाज का भडकला ?
‘सलमान खानचे किस्से तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेतच’ असं म्हणत रिपोर्टरने सुरूवात केली, पण त्याला मध्येच थांबवत त्यावर अरबाजने आक्षेप घेतला. ” सलमानचे काय किस्से माहीत आहेत? मग तेच पुन्हा रिपीट का करायंचं ? सोडून दे ना आता.. असं अरबाज म्हणाला,त्यानतंरही त्या रिपोर्टरने त्याचं घोडं पुढे दामटवत तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला.ते पाहुन अरबाज आणखी संतापला.
सलमानच्या इंटरव्ह्यूसाठी जाशील तेव्हा विचार .. थेट सुनावलं
‘ तू काल त्रिघोरीबद्दल बोल ना.. तू जेव्हा सलमान खानच्या इंटरव्ह्यूसाठी जाशीला ना तेव्हा हे बोल. प्रत्येक वेळेस सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाला मध्ये आणणं गरजेचं आहे का ? हा प्रश्न त्याचे नाव न घेता विचारता आला असता ना, बरोबर? अरे, मी तुम्हाला खूप दिवसांपासून ओळखतो. जोपर्यंत तू असे उलट सुलट प्रश्न विचारत नाहीस तुला चैन पडत नाही ना.. सगळ्यांचे प्रश्न विचारून संपण्याची तू वाट पाहतोस की आता मला प्रश्न विचारता येईलं’ असं म्हणत अरबाजने त्यांलवा चांगल धारेवर धरलं, एवढंच नव्हे तर नंतर अरबाजने त्या रिपोर्टरला हाच प्रश्न रि-फ्रेम करून विचारण्यास सांगितलं.
‘काल त्रिघोरी’ ची रिलीज डेट
“काल त्रिघोरी” हा चित्रपट नितीन वैद्य यांनी दिग्दर्शित केला आहे. हा एक हॉरर-थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये आदित्य श्रीवास्तव, महेश मांजरेकर, राजेश शर्मा, ऋतुपर्णा सेनगुप्ता आणि मुग्धा गोडसे यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 14 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.