
आयकॉनिक प्लॅबॅक सिंग अरिजीत सिंह याने आपल्या रिटायरमेंटची घोषण करुन कोट्यवधी चाहत्यांचे हृदय तोडले आहे. अरिजीत सिंह आता केवल ३८ वर्षाचे आहेत. त्यांनी प्लेबॅक सिंगिंगला अलविदा केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अरिजीत सिंह यांनी त्याच्या निवृत्तीची घोषणा एक सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. अरिजीत सिंह त्याच्या दैवी आवाज आता चित्रपट गीतांना देणार नसल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसणार आहे. अरिजीत सिंह याचा संगीत प्रवास मोठा रंजक ठरला आहे.अरिजीत लोकप्रिय रियालिटी टीव्ही शो ‘फेम गुरुकुल’मध्ये कंटेस्टेंट म्हणून प्रथम नजरेस आला होता.
अरिजीत सिंह याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यात त्याने सांगितले की होते की त्याचा आवाज आधी असा नव्हता. त्याने त्याच्या आवाजाला मोडून तोडून असे तयार केले होते. या व्हिडीओ नंतर अरिजीतचा त्या रियालिटी शोमधील आवाज ऐकवणारी क्लिप लागते. त्यानंतर त्याचा आताचा आवाज ऐकवला जातो. दोन्ही आवाजातील फरक लागलीच लक्षात येतो. काही फरक पडत नाही अरिजीत याचा आजचा आवाज जगभर गाजत आहे, त्यावेळी त्या रियालिटी शोमध्ये तो टॉप-5 मध्ये देखील येऊ शकला नव्हता. शोच्या जजनी त्याच्यावर टीका केली होती.
रियालिटी शो हरल्यानंतर अरिजीत सिंह शांत बसला नाही. त्याने मुंबईत एका छोट्याशा घरात राहून अनेक वर्षे मोठ्या संगीतकारांसाठी म्युझिक प्रोग्रॅमिंग केले. अरिजित हा शो हरल्यानंतर त्यातून त्याने यशाची पायरी चढण्यास सुरुवात केली. नेहमी असे म्हटले जाते की रियालिटी शो जिंकणारे मोठे स्टार बनतात. परंतू अरिजीत याने हा शो हरुनही हार मानली नाही आणि हा धारणा तोडून दाखवत हरल्यानंतरही विजय मिळवला. अरिजीत याने बॉलीवूडमध्ये जी गाणी गायली ती दुसऱ्या गायकांच्या आवाजात पसंद केली जात नाहीत इतकी ती अरिजीत सिंह याच्या आवाज चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत.अरिजीत त्याच्या रोमँटिक आणि दर्दभरे गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
अरिजीत सिंह याने सोशल मीडियावर पोस्ट करीत पार्श्वगायिकेला रामराम केले आहे.अरिजीत आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की तुम्हा सर्वांना नव्या वर्षांच्या शुभेच्छा. इतकी वर्षे माझी गाणी ऐकून मला एवढे प्रेम देण्याबद्दल सर्वांचे आभार, मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की आता मी प्लेबॅक वोकलिस्ट म्हणून कोणतीही नवीन असाईन्मेंट स्वीकारणार नाही.