Arijit Singh : अरिजीत सिंह याचा पार्श्वगायनातून धक्कादायक संन्यास, चाहत्यांना मोठा हादरा
संगीतजगात आपल्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा गायक अरिजित सिंह यांनी पार्श्वगायकीतून संन्यास घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.त्यामुळे त्याच्या चाहत्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Arijit Singh Retirement: भारतीय संगीत जगतातून एक अशी बातमी आली आहे जी वाचून कोट्यवधी चाहत्यांना धक्का बसेल.आपल्या आवाजाने प्रत्येक हृदयावर राज्य करणारे सिंगर अरिजीत सिंह यांनी आता प्लेबॅक सिंगिंग ( चित्रपटासाठी पार्श्वगायन ) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अरिजीतने सोशल मीडिया हँडल (X) द्वारे ही धक्कादायक बातमी दिली आहे. अरिजीत याने स्पष्ट केले आहे की तो आता कोणत्याही नव्या चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करणार नाही.परंतू संगीताची दुनिया आपण सोडणार नाही असेही त्याने नमूद केले आहे.
जादुई आवाजाची देणगी लाभलेला बॉलीवूडचा तरुण गायक अरिजीत याने आपल्या कोट्यवधी चाहत्यांना आश्चर्यचकीत करणारा धक्कादायक निर्णय घेतला आहे. अरिजीत याने ट्वीटर ( एक्स ) वर पोस्ट करताना लिहीलंय की, ‘सर्वांना नव्या वर्षांच्या शुभेच्छा. इतकी वर्षे एक श्रोत्यांच्या रुपात मला एवढे प्रेम देण्यासाठी मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊ इच्छीतो. मी हे घोषणा करताना आनंदीत आहे की मी आता प्लेबॅक सिंगर म्हणून कोणतीही नवीन असाईनमेंट घेणार नाही. मी हे येथेच थांबवत आहे.’
म्यूझिकवर काम करीत राहीन – अरिजीत
अरिजीत सिंह याने पुढे लिहीलंय की हा प्रवास खूपच शानदार राहिला आणि ईश्वर माझ्यावर खूप मेहरबान राहिला आहे. त्याने स्वत: ‘एक छोटा कलाकार’ कलाकार म्हणत भविष्यात आपण संगीत आणखी जवळून शिकू इच्छीत आहे. चाहत्यांना एक दिलासा आहे की अरिजीत सिंह संगीताच्या या दुनियेत चाहत्यांना भेटत राहतील. त्याने स्पष्ट केले आहे की प्रोजेक्ट्स आणि स्वतंत्र संगीत ( इंडिपेंडेंट म्युझिक ) वर काम जारी ठेवणार आहे.
अरिजीत याने हे देखील स्पष्ट केले आहे की त्यांच्या जवळ काही प्रोजेक्ट आधीपासूनच पाईपलाईनमध्ये आहे.त्यांना आपण पूर्ण करणार आहोत. त्यामुळे या वर्षी त्यांची काही गाणी चाहत्यांना ऐकायला मिळतील. जी आधीच रेकॉर्ड झाली आहेत. ज्यावर काम चालू आहे.
येथे पाहा पोस्ट –
View this post on Instagram
अरिजीत सिंह याचे लेटेस्ट गाणे
अलिकडे अरिजीत सिंग याचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. ज्याचे टायटल आहे ‘मातृभूमी’. हे गाणे सलमान खान याच्या अपकमिंग चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ चे आहे. हे गाणे अरिजीत सिंह आणि श्रेया घोषाल सोबत मिळून गायले आहे. म्युझिक हिमेश रेशमिया याने दिले आहे. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
