
Arjun Kapoor – Malaika Arora : कलाविश्वातील अनेक जोड्या ब्रेकअपनंतर एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण नातं ठेवताना दिसतात. परंतु अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्याबाबत असं काही झालं नाही. याच कारणामुळे मुंबईत नुकत्याच एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान जेव्हा दोघं अचानक एकमेकांसमोर आले, तेव्हा दोघांमधील संकोचलेपणा स्पष्ट दिसत होता. ‘होमबाऊंड’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला या दोघांनी हजेरी लावली होती. आजूबाजूला बरेच पापाराझी आणि फोटोग्राफर्स असल्याने मलायका आणि अर्जुनने एकमेकांची गळाभेट घेतली आणि बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर पुन्हा दोघांमधील संकोचलेपणा दिसू लागला. या दोघांचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
बहीण जान्हवी कपूरच्या ‘होमबाऊंड’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अर्जुन कपूर पोहोचला होता. त्याचवेळी मलायकासुद्धा तिथे उपस्थित होती. एका व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन अचानक एकमेकांसमोर येतात. तेव्हा मलायका आधी अर्जुनकडे पाहूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करते. अर्जुनसुद्धा मलायकाकडे पाहतो आणि नंतर अभिनेत्री नेहा धुपियाशी बोलू लागतो. त्यानंतर मलायका तिथून निघून जाते. हे दोघं एकमेकांशी बोलणं टाळतात. नंतर पुन्हा एकदा जेव्हा मलायका आणि अर्जुन एकमेकांसमोर येतात, तेव्हा ते एकमेकांची गळाभेट घेतात. अर्जुन मलायकाला काहीतरी विचारतो. तीसुद्धा त्याचं उत्तर देते आणि पुन्हा तिथून निघून जाते. ब्रेकअपनंतर अचानक एकमेकांसमोर आल्याचा संकोचलेपणा त्यांच्यात स्पष्ट जाणवत होता.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सगळं प्रेम एका बाजूला आणि हे विचित्र क्षण दुसऱ्या बाजूला’, असं एकाने लिहिलं. तर ‘अत्यंत ऑकवर्ड क्षण’ असं दुसऱ्याने म्हटलंय. तर काहींनी मलायका आणि अर्जुन यांनी पुन्हा एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केली. हे दोघं जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी जाहिररित्या नात्याची कबुली दिली होती. 2024 च्या सुरुवातीला त्यांचं ब्रेकअप झालं. अर्जुनने एका कार्यक्रमात सर्वांसमोर ‘मी आता सिंगल आहे’ असं म्हटलं होतं. त्यानंतर मलायकानेही अप्रत्यक्षपणे रिलेशनशिपमध्ये नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ब्रेकअपनंतर जेव्हा मलायकाच्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा अर्जुन तिचं सांत्वन करण्यासाठी पोहोचला होता.