Drugs Case | तब्बल 6 तासांनंतर गॅब्रिएला एनसीबी कार्यालयातून बाहेर, अर्जुनची चौकशी होणार!

ड्रग्ज प्रकरणात अर्जुनच्या मैत्रिणीचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला नुकताच जामीन मिळाला आहे.

Drugs Case | तब्बल 6 तासांनंतर गॅब्रिएला एनसीबी कार्यालयातून बाहेर, अर्जुनची चौकशी होणार!
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 6:46 PM

मुंबई : तब्बल 6 तासांच्या चौकशीनंतर गॅब्रिएला एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली आहे. बुधवारी (11 नोव्हेंबर) संध्याकाळच्या सुमारास तिची चौकशी आटोपली आहे. गुरुवारी (12 नोव्हेंबर) अभिनेता अर्जुन रामपालला चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. यावेळी पुन्हा एकदा गॅब्रिएलाची चौकशी होण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि त्यांची लिव्ह-इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्स (Gabriella Demetriades) यांना एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले होते (Arjun rampal’s girlfriend Gabriella demetriades arrives at ncb office).

या समन्सनुसार अर्जुन आणि गॅब्रिएलाला 11 नोव्हेंबरपर्यंत चौकशीसाठी हजर व्हायचे होते. आज (11 नोव्हेंबर) अर्जुन रामपालची चौकशी होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, गॅब्रिएला एकटीच एनसीबी कार्यालयात दाखल झाली होती. यावेळी अर्जुन रामपाल गैरहजर असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.

सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीकडून छापा टाकण्यात आला होता. या धाडीदरम्यान त्याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अवैध, बंदी घालण्यात आलेली औषधे जप्त करण्यात आली होती. यानंतर एनसीबीने अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड ग्रॅबिएला यांना चौकशी करता हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते.

ड्रग्ज प्रकरणात अर्जुनच्या मैत्रिणीचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला नुकताच जामीन मिळाला आहे. परंतु, यानंतर एनसीबीला काही मोठे पुरावे मिळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकण्यात आला.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात अर्जुन रामपाल अडकणार? एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स!

एनसीबीची मोठी कारवाई

सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल 7 ते 8 तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. तसेच, अर्जुनच्या वाहन चालकाला ताब्यात घेतल्याचे कळते आहे (Arjun rampal’s girlfriend Gabriella demetriades arrives at ncb office).

ड्रग्ज प्रकरणात अर्जुनच्या मेहुण्याचे नाव

या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, आता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

(Arjun rampal’s girlfriend Gabriella demetriades arrives at ncb office)

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.