Arrest Yuvika Choudhary | युविका चौधरीनेही उच्चारला ‘तोच’ जातीवाचक शब्द, ‘बबिता’नंतर आता युविका वादात!

| Updated on: May 25, 2021 | 11:45 AM

अलीकडेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘बबिता जी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरला होता.

Arrest Yuvika Choudhary | युविका चौधरीनेही उच्चारला ‘तोच’ जातीवाचक शब्द, ‘बबिता’नंतर आता युविका वादात!
युविका चौधरी
Follow us on

मुंबई : अलीकडेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘बबिता जी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरला होता. यानंतर तिच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी झाली होती. यानंतर तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता ‘ओम शांती ओम’ फेम अभिनेत्री युविका चौधरी (Yuvika Choudhary) हीने देखील आपल्या नव्या व्हिडीओमध्ये पुन्हा ‘तो’च जातीवाचक शब्द वापरला आहे. आता सोशल मीडियावर तिला अटक करण्याची मागणी होत आहे (Arrest Yuvika Choudhary trending on social media know the reason behind).

युविकाने सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा पती प्रिन्स नरुला आपले केस कापून घेताना दिसत असून, अंगावर कापड घेऊन बसला आहे. तर, युविका घरभर फिरून एक व्हिडीओ बनवत आहे. व्हिडीओ बनवताना युविका म्हणते की, ‘जेव्हा जेव्हा मी व्लॉग बनवते, तेव्हा मी येऊन ** सारखी का उभी राहते? मला स्वत:ला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. मी खूप बेकार दिसत आहे आणि प्रिन्स मला तयार होण्यास वेळ देत नाही.’

युविकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि #ArestrestYuvikaChoudhary  सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

मुनमुन दत्तावर कारवाई

काही काळापूर्वी मुनमुनने आपल्या एका व्हिडीओमध्ये विशिष्ट जातीबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि बर्‍याच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या अभिनेत्रीविरोधात संताप व्यक्त करत, तिला अटक करण्याची मागणी केली होती.

आपली चूक लक्षात येताच मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मुनमुनने आपल्या निवेदनात लिहिले आहे की, ‘हे मी काल पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या संदर्भात आहे. जिथे मी वापरलेल्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. माझा कधीच एखाद्याच्या भावना दुखावणे, धमकावणे किंवा इतर कोणता असा हेतू नव्हता. मर्यादित भाषेच्या ज्ञानामुळे, मी त्या शब्दाचा अर्थ माहित नसतान देखील वापरला.’

(Arrest Yuvika Choudhary trending on social media know the reason behind)

हेही वाचा :

सलमानच्या ‘Radhe’ची पायरसी कराल तर खबरदार! निलंबित केला जाणार व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय!

Devmanus | ‘देवमाणूस’ डिंपलसोबत विवाहबंधनात, लग्नात दिव्याचा खोडा की सरु आजीचा राडा?