‘तारक मेहता…’च्या ‘बबिता’विरोधात एफआयआर दाखल, जाणून घ्या नेमकं काय झालं?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah ) या टीव्ही शोमधील ‘बबिता’ अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिच्याविरोधात हरियाणाच्या हंसी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

‘तारक मेहता...’च्या ‘बबिता’विरोधात एफआयआर दाखल, जाणून घ्या नेमकं काय झालं?
मुनमुन दत्ता

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka ooltah chashmah ) या टीव्ही शोमधील ‘बबिता’ अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिच्याविरोधात हरियाणाच्या हंसी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुनमुनने आपल्या व्हिडीओमध्ये एका विशिष्ट जातीबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे नुकताच हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी अभिनेत्रीविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे (FIR file against Taarak Mehta ka ooltah chashmah babita fame actress Munmun Dutta).

या आधी मुनमुनविरोधात पौरी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. अखिल भारतीय युवा कोळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी ही तक्रार दिली असून, अभिनेत्रीविरोधात कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आमचा अपमान करण्याचा प्रयत्न

नॅशनल अलायंस फॉर दलित हुमन राइट्सचे संयोजक रजत कलसन म्हणाले की, “अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि तिने केवळ आम्हाला नीचा दाखवण्यासाठी असे म्हटले आहे.” मुनमुनविरोधात ज्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते सर्व कलम अजामीनपात्र आहेत आणि या कलमांमध्ये अटकपूर्व जामिनाची देखील तरतूद नाही.’

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काही काळापूर्वी मुनमुनने आपल्या एका व्हिडीओमध्ये विशिष्ट जातीबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि बर्‍याच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या अभिनेत्रीविरोधात संताप व्यक्त करत, तिला अटक करण्याची मागणी केली (FIR file against Taarak Mehta ka ooltah chashmah babita fame actress Munmun Dutta).

अभिनेत्रीने मागितली माफी

आपली चूक लक्षात येताच मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मुनमुनने आपल्या निवेदनात लिहिले आहे की, ‘हे मी काल पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या संदर्भात आहे. जिथे मी वापरलेल्या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. माझा कधीच एखाद्याच्या भावना दुखावणे, धमकावणे किंवा इतर कोणता असा हेतू नव्हता. मर्यादित भाषेच्या ज्ञानामुळे, मी त्या शब्दाचा अर्थ माहित नसतान देखील वापरला.’

दुखावलेल्या प्रत्येक व्यक्तीची मागितली माफी

त्यांच्या पोस्टमध्ये मुनमुन पुढे म्हणाली, ‘नंतर मला त्याचा अर्थ कळला आणि मी लगेच तो भाग काढून टाकला. मला प्रत्येक जाती, वंशाच्या किंवा लिंगातील प्रत्येक व्यक्तीबद्दल अत्यंत आदर आहे आणि मी आपल्या समाजात किंवा राष्ट्रासाठी त्यांच्या अपार योगदानाची कबुली देतो. या शब्दाच्या वापरामुळे अनवधानाने दुखावले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची मला मनापासून मागायची आहे आणि त्याबद्दल मला खूप वाईट वाटले आहे.’

(FIR file against Taarak Mehta ka ooltah chashmah babita fame actress Munmun Dutta)

हेही वाचा :

आधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले…..

सलमान खानच्या ‘राधे’वर बहिष्काराची मागणी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottRadhe, जाणून घ्या कारण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI