आधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले…..

अलीकडेच कोरोना विषाणूला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेत मोदी सरकारवर टीका करणारे अनुपम खेर (Anupam Kher) यांनी पुन्हा एकदा आपला सूर बदलला आहे.

आधी मोदी सरकारवर थेट टीका, आता अनुपम खेर यांनी घेतला युटर्न, म्हणाले.....
अनुपम खेर
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 1:26 PM

मुंबई : अलीकडेच कोरोना विषाणूला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेत मोदी सरकारवर टीका करणारे अनुपम खेर (Anupam Kher) यांनी पुन्हा एकदा आपला सूर बदलला आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आता असे म्हटले आहे की, ‘काम करणार्‍यांकडून चुका होत असतात, बिनकामी लोकांचे आयुष्य इतरांच्या चुका शोधण्यात निघून जाते.’ अनेकदा मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक करणारे अभिनेते अनुपम खेर यांनी बुधवारी मोदी सरकारवर टीका केली आणि म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशात जे घडत आहे त्यासाठी सरकारला जबाबदार धरणे आवश्यक आहे. पण, आता ते त्यांच्या या ट्विटची अर्थात आपल्या विधानाची सारवासारव करताना दिसत आहेत (Anupam Kher Tweeted new lines after criticized Central government).

‘इमेज’ तयार करणार्‍या वक्तव्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर अनुपम खेर यांनी आज आणखी एक ट्वीट केले की, “चूका केवळ काम करणार्‍या लोकांकडून होतात, बिनकामी लोकांचे जीवन केवळ दुसर्‍याच्या वाईट गोष्टी शोधण्यातच संपते.” हे ट्वीट अनुपम खेर यांच्या मागील विधानाशी जोडले जात आहे, ज्यात त्यांनी प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा आयुष्यात बरेच काही आहे, असे म्हटले होते. ते म्हणाले होते की, अधिकाऱ्यांवरील जाहीर टीका ही ‘बऱ्याच बाबतीत कायदेशीर’ आहे.

पाहा अनुपम यांचे नवे ट्विट

प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे : अनुपम खेर

बुधवारी (12 मे) एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी म्हटले होते की, “सध्या जी टीका होत आहे, ती बऱ्याच उदाहरणांमध्ये सत्य आहे. सध्या ज्या जनतेने सरकारला निवडून दिलेले आहे, त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. सरकारला ज्या कामासाठी निवडून देण्यात आलेले आहे ते काम सरकारने करायला हवे. देशात मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचं दिसतंय. एखादी मानवी मन नसलेली व्यक्तीच ही घटना पाहून दु:खी होणार नाही. सध्या सरकारने प्रतिमा संवर्धन करण्यापेक्षा दुसरंही काही महत्त्वाचं आहे, हे समजून घेण्याची गरज आहे,” असे अनुपम खेर म्हणाले. तसेच पुढे बोलताना काही ठिकाणी केंद्र सरकारने चूक केली आहे. त्यामुळे त्यांना यामध्ये जबाबदार धरायला हवे. मात्र, याच गोष्टीचे समोरच्या पक्षाने भांडवल करणेसुद्धा चुकीचे आहे, असेही शेवटी अनुपम खेर म्हणाले (Anupam Kher Tweeted new lines after criticized Central government).

विरोधकांनाही घेरले

गंगा व इतर नद्यांमध्ये अनेक मृतदेह तरंगत असल्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी असे म्हटले होते की, ‘बर्‍याच प्रकरणांमध्ये ही टीका वैध आहे … नद्यांमध्ये वाहणाऱ्या मृतदेहांमुळे कोणत्या व्यक्तीला त्रास होणार नाही?’ पुढे ते म्हणाले, ‘परंतु अन्य पक्षांनी ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे योग्य नाही. जे घडत आहे त्यासाठी सरकारला जबाबदार धरणे आवश्यक आहे. प्रतिमा निर्मितीपेक्षा यात आणखी बरेच काही आहे हे समजून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.’

(Anupam Kher Tweeted new lines after criticized Central government)

हेही वाचा :

सलमान खानच्या ‘राधे’वर बहिष्काराची मागणी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #BoycottRadhe, जाणून घ्या कारण

अमिताभ बच्चन यांची देणगी परत करा, गुरुद्वारा समितीने मदत स्वीकारल्यानंतर संतापला समुदाय!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.