अमिताभ बच्चन यांची देणगी परत करा, गुरुद्वारा समितीने मदत स्वीकारल्यानंतर संतापला समुदाय!

दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक समितीने (DSGPC) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडून दोन कोटी रुपयांची देणगी घेतल्यामुळे शीख पंथातील वाद आणखी वाढला आहे.

अमिताभ बच्चन यांची देणगी परत करा, गुरुद्वारा समितीने मदत स्वीकारल्यानंतर संतापला समुदाय!
अमिताभ बच्चन

मुंबई : दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक समितीने (DSGPC) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडून दोन कोटी रुपयांची देणगी घेतल्यामुळे शीख पंथातील वाद आणखी वाढला आहे. हरियाणा शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती (HSGPC) यांच्यासह विविध शीख संघटनांनी दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी शीख समुदायाची माफी मागावी आणि अमिताभ बच्चन यांनी घेतलेल्या देणगीची रक्कम तातडीने परत करावी, अन्यथा कारवाईला तयार रहाण्याची मागणी केली आहे. शिवाय शीख समुदायाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही म्हटले आहे (Controversy over Amitabh Bachchan donation to DSGPC delhi).

सध्या कोरोनाची साथ वेगाने पसरत आहे, अशा स्थितीत अनेक संस्था आणि बरेच लोक मोठ्या जोमाने समाजाची सेवा करत आहेत. त्याच वेळी, असे काही लोक आहेत जे देणगी देऊन आपला सहभाग दर्शवत आहेत. चित्रपट कलाकारही यात फारसे मागे नाही. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड मेगास्टार, अमिताभ बच्चन यांनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी दिल्लीच्या गुरुद्वारा रकब गंज साहिब येथे सुरू केलेल्या श्री गुरु तेग बहादुर कोव्हिड केअर सेंटरला दोन कोटी रुपये दान केले आहेत. याबाबत उत्तर प्रदेश अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य सरदार परमिंदर सिंग यांनी बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या दोन कोटी रुपयांच्या देणगीवर टीका केली आहे.

अमिताभ यांनी दिलेली देणगी परत करण्याची मागणी

त्याचबरोबर अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्याने दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि अध्यक्ष सरदार मनजिंदरसिंग सिरसा यांच्याकडून घेतलेली देणगी त्वरित परत करण्याची मागणी केली आहे. सरदार परविंदर सिंग म्हणतात, ‘कोरोना रुग्णांची सेवा करण्याच्या दृष्टीने अभिनेता अमिताभ बच्चन यांनी दिल्ली शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीला 2 कोटी रुपये दान केल्याची बातमी मिळाली आहे. दिल्लीच्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि तिचे अध्यक्ष सरदार मनजिंदरसिंग सिरसा यांना आहे माझी विनंती की, तिसर्‍या गुरूंच्या वेळी सम्राट अकबरलाही गुरुंना बरीच जहागीर आणि गावे द्यायची इच्छा होती, परंतु तिसर्‍या गुरूंनी हे सगळे नाकारले कारण ही अकबराची स्वतःची कमाई नव्हती. आपणही असेच करावे.’(Controversy over Amitabh Bachchan donation to DSGPC delhi)

जुन्या भळभळत्या जखमा

हरियाणासिंग गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष संतसिंग बाबा बलजितसिंग दादूवाल म्हणाले की, दिल्ली दंगलीतील पीडित कुटुंबातील सदस्यांच्या जुन्या जखमा अमिताभ बच्चन यांच्याकडून देणगी घेऊन पुन्हा ताज्या झाल्या आहेत. हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही.

ऑल इंडिया शीख स्टुडंट्स फेडरेशनचे संयोजक व अकाली दल टकसालीचे सरचिटणीस, कर्नेलसिंह पीर मोहम्मद यांनीही सांगितले की, अमिताभ बच्चन यांची देणगी स्वीकारून सिरसाने आपली प्रतिमा खराब केली आहे. ते म्हणाले की, अमिताभ बच्चन यांना अशा उपक्रमांद्वारे शीख समाजात आपले स्थान निर्माण करायचे आहे.

(Controversy over Amitabh Bachchan donation to DSGPC delhi)

हेही वाचा :

Photo : ‘ईद मुबारक…’, मराठमोळ्या स्मिता गोंदकरकडून हटके अंदाजात शुभेच्छा

यशराज फिल्म्सच्या ‘गोल्डन ज्युबिली’ सोहळ्याचे पैसे ‘या’ कामासाठी वापरणार, आदित्य चोप्रांचे कौतुकास्पद पाऊल!