अर्शी खान थेट म्हणाली, ती काहीही करू शकते, राखी सावंत हिच्याबद्दल मोठा खुलासा
राखी सावंत ही सतत चर्चेत आहे. नुकताच राखी सावंत ही भारतामध्ये दाखल झालीये. विशेष म्हणजे राखी सावंत हिचे जोरदार स्वागत करण्यात आले. राखी सावंत हिने आपल्या आयुष्यामधील पहिला उमराह केलाय. राखी सावंत ही मोठ्या वादात सापडल्याचे बघायला मिळत आहे.

मुंबई : राखी सावंत हिचा पती आदिल दुर्रानी हा जेलमधून बाहेर आल्यापासून राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. आदिल दुर्रानी याने जेलमधून बाहेर येताच स्पष्ट केले की, माझ्यासोबत खूप काही गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत. यानंतर आदिल दुर्रानी (Adil Durrani) याने एक प्रेस घेत राखी सावंत हिच्याबद्दल काही अत्यंत मोठे खुलासे केले. आदिल दुर्रानी याचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. राखी सावंत हिने आदिल दुर्रानीवर गंभीर आरोप केले. त्यानंतर यांचे प्रकरण थेट कोर्टात गेले.
आदिल दुर्रानी हा राखी सावंत हिच्यावर आरोप करत असतानाच राखी सावंत ही थेट उमराह करण्यासाठी गेली. नुकताच राखी सावंत ही भारतामध्ये परतलीये. मात्र, यावेळी राखी सावंत हिचा एक वेगळाच अंदाज बघायला मिळतोय. राखी सावंत हिचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर लोकांनी मोठी गर्दी देखील केल्याचे बघायला मिळाले.
आता नुकताच राखी सावंत हिच्याबद्दल एका मुलाखतीमध्ये अर्शी खान ही बोलताना दिसली आहे. अर्शी खान म्हणाली की, राखी सावंत ही कोणत्याही धर्मामध्ये जाऊ शकते. अगोदर ती म्हणायची की, ती ख्रिचन आहे मग कधीमध्ये हिंदू आता ती मुसलमान झालीये. अजून राखी किती धर्म बदलेल हे सांगणे देखील कठीण आहे.
पुढे अर्शी खान म्हणाली की, जर खरोखरच आदिल दुर्रानी याचे पैसे राखी सावंत हिने घेतले असतील तर तिने ते नक्कीच परत करायला हवेत. परंतू मला माहिती नाही की, तिने पैसे घेतले की नाही. आदिल दुर्रानी याच्या बोलण्यात कुठेतरी सत्यता मला दिसते. आदिल दुर्रानी मला चांगला माणूस वाटतो.
मराठी बिग बाॅसच्या घरातून बाहेर आल्यानंतर राखी सावंत हिने मोठा खुलासा करत जाहिर केले की आपण लग्न केले. विशेष म्हणजे काही महिने राखी सावंत हिने आपले लग्न सर्वांपासून लपवून ठेवले. राखी सावंत हिने लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले. राखी सावंत हिने आदिल याच्यासोबत अगोदर कोर्टात लग्न केले मग निकाह केला.
राखी सावंत हिच्या लग्नाबद्दल ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. काही दिवस राखी सावंत हिचा संसार सुखाने होताना देखील दिसला. मात्र, अचानकच राखी सावंत हिने पती आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरूवात केली. ज्यानंतर लोक हैराण झाले. राखी सावंत हिच्या तक्रारीनंतर काही महिने जेलमध्ये राहण्याची वेळ आदिलवर आली.
