आर्यन खान वडील शाहरुख खानला सीन समजावतानाचे फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले ‘बापाला नको शिकवू’
आर्यन खानने 'द बॅडज ऑफ बॉलीवूड' सीरिजसाठी दिग्दर्शन केले आहे. या सीरिजमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहे . तसेच सुपरस्टार शाहरूख खानही आहे. आर्यनन स्वत:च्या वडिलांना सीन समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आर्यन खान दिग्दर्शित नेटफ्लिक्सवरील “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मालिकेत आर्यन खानने लक्ष्य लालवानी, मोना सिंग आणि मनोज पाहवा यांसारख्या कलाकारांचे दिग्दर्शन केले होते या कलाकारांच्या यादीत इंडस्ट्रीतील सर्वात मोठा सुपरस्टार म्हणजे शाहरुख खान दोखील पाहायला मिळत आहे. आर्यन खानने त्याचे वडील शाहरुख खान यांचे दिग्दर्शन केले होते आणि आता शूटिंगचे सेटवरील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आर्यन खान त्याचे वडील शाहरुख यांना गंभीरपणे सीन समजावून सांगताना दिसत आहे.
आर्यन किंग खानला एका सीनचे स्पष्टीकरण देताना
शाहरुख खानची निर्मिती कंपनी, रेड चिलीजने “द बॅडीज ऑफ बॉलिवूड” च्या शूटिंगमधील दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आर्यन किंग खानला एका सीनचे स्पष्टीकरण देताना दिसत आहे. या फोटोंना चाहत्यांचेही भरभरून प्रेम मिळालं. चाहत्यांना ही वडील-मुलाची जोडी खूप आवडली आहे. दोघेही त्यांच्या कामाबद्दल फार गंभीर काहितरी चर्चा करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडिया वापरकर्त्यांची प्रतिक्रिया
ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडिया नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, “या दोघांची जोडी हिट आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले, “सिम्बा आणि मुसाफा एकत्र” तर अजून एका नेटकऱ्यानं म्हटलं ‘शाहरुख म्हणत असेल आर्यनला, बापाला नको शिकवू’. पण शाहरूख खानने नेहमीच आपल्या मुलांना पाठिंबा दिला आहे. एकीकडे चाहत्यांकडून त्याचे कौतुकही करतायत कारण एवढा मोठा सुपरस्टार पण तरीही मुलाच्या मेहनतीचा आदर ठेवत त्याने दिलेल्या सुचनाही नम्रपणे पाळत आहे.
मुलगी सुहानासाठी चित्रपट बनवला जात आहे
मुलगा आर्यन खाननंतर, शाहरुख खान आता त्याची मुलगी सुहाना खानला इंडस्ट्रीत स्वतःची ओळख करून देण्यासाठी मदत करत आहे. दोघेही “किंग” चित्रपटात दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे शुटींग सुरू आहे. किंग खान हा चित्रपट यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी, दीपिका पदुकोण, जयदीप अहलावत आणि अर्शद वारसी सारखे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.
