AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosle: आशा भोसले यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

Asha Bhosle: आशा भोसले यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?
Asha Bhosle
| Updated on: Sep 30, 2025 | 9:39 PM
Share

जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अमेरिकेतील दोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) प्लॅटफॉर्म ऑडिओ आणि व्हिज्युअल सामग्री तयार करण्यासाठी अत्याधुनिक अल्गोरिदम वापरतात. यात त्यांनी ‘एआय’द्वारे आशाताईंचा आवाज, त्यांची गायन शैली यांची हुबेहूब नक्कल करत आपल्या रेकॉर्डिंगमध्ये या आवाजाचा बेकायदेशीररित्या वापर केला आहे. त्यामुळे आशा भोसले यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हायकोर्टाने काय म्हटले?

आशा भोसले यांचे वकील अंकित लोहिया यांनी वैयक्तीक हक्कांच्या रक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्यासमोर सुनावणी झाली. या याचिकेची गंभीर दखल घेत हायकोर्टानं आशा भोसले यांना अंतरिम दिलासा देण्याबाबत लवकरच सविस्तर आदेश जारी केले जातील अशी माहिती दिली आहे. सध्या सुनावणी दोन आठड्यांसाठी तहकूब केली आहे.

आपल्या आवाजाचा आणि शैलीचा गैरवापर केल्याचा आरोप आशा भोसले यांनी केला आहे. याआधी असाच प्रकार गायक अरिजीत सिंग यांच्याबाबत झाला होता. त्यावेळी कोर्टाने अरिजीत सिंगला दिलासा दिला होता अशी माहितीही आशा भोसले यांच्या वकीलावे कोर्टात दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कारवाई व्हावी असं आशा भोसले यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.

आशा भोसले कोण आहेत?

आशा भोसले या प्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. त्यांनी हिंदीसह अनेक भाषांमध्ये 12 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. शास्त्रीय संगीत, पॉप, गझल, भजन, कॅबरे अशा विविध शैलींमध्ये त्यांनी गायन केलं आहे. त्यांना पद्म विभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यासारखे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. भारतीय संगीतविश्वात त्यांचे योगदान अमूल्य आहे. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम”, “चुरा लिया है तुमने जो दिल को”, “इन आँखों की मस्ती”, “तुमसे मिलके” ही आशा भोसले यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...