AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Parekh | आशा पारेख यांनी दाखवला विवेक अग्निहोत्री यांना आरसा, थेट म्हणाल्या, द काश्मीर फाईल्स…

विवेक अग्निहोत्री हे कायमच चर्चेत असतात. विवेक अग्निहोत्री यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विवेक अग्निहोत्री हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. विवेक अग्निहोत्री यांचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट रिलीज झालाय.

Asha Parekh | आशा पारेख यांनी दाखवला विवेक अग्निहोत्री यांना आरसा, थेट म्हणाल्या, द काश्मीर फाईल्स...
| Updated on: Oct 11, 2023 | 3:28 PM
Share

मुंबई : विवेक अग्निहोत्री यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा काही दिवसांपूर्वीच द काश्मीर फाईल्स हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे द काश्मीर फाईल्स या चित्रपटाने धमाका केला. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरला. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळाली. विवेक अग्निहोत्री याच्या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर (Box office) अनेक रेकाॅर्ड ब्रेक केले. चाहत्यांनी या चित्रपटाला प्रचंड प्रेम दिले.

द काश्मीर फाईल्स चित्रपटामध्ये 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पाहून लोकांनी संताप देखील व्यक्त केला. इतकेच नाही तर द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या रिलीजनंतर विवेक अग्निहोत्री यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या या देण्यात आला. ज्यानंतर सरकारने त्यांना Y दर्जाची सुरक्षा दिली.

आता नुकताच आशा पारेख यांनी विवेक अग्निहोत्री यांच्यावर निशाना साधलाय. यावेळी अत्यंत मोठे भाष्य करताना आशा पारेख दिसल्या. नुकताच आशा पारेख यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीवेळी त्यांना द काश्मीर फाईल्स आणि द केरळ स्टोरी हे चित्रपट बघितले का विचारण्यात आले. यावर त्यांनी मोठा खुलासा केला.

आशा पारेख म्हणाल्या की, मी द काश्मीर फाईल्स आणि द केरळ स्टोरी हे दोन्ही चित्रपट बघितले नाहीयेत. जर लोकांना हे चित्रपट आवडत असतील तर त्यांनी नक्कीच बघायला हवेत. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर बोलताना आशा पारेख या म्हणाल्या की, चित्रपटाच्या प्रोड्यूसर 400 कोटी रूपये कमावले आहेत.

तर त्यांनी हे पैसे त्यांच्या हिंदू कश्मीरी लोकांना दिले? जे आता सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये राहतात. ज्यांच्या जवळ आता पाणी आणि लाईट देखील नाहीये. 400 कोटींमधून 200 किंवा 50 कोटी दिले का? आता आशा पारेख यांनी केलेल्या या विधानांमुळे जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. आता यावर विवेक अग्निहोत्री हे काय भाष्य करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...