AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Vidyarthi | वयाच्या ६० व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी यांची पहिली प्रतिक्रिया

'रुपाली हिच्यासोबत लग्न करणं म्हणजे...', ३३ वर्ष लहान महिलेसोबत लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी यांची पहिली प्रतिक्रिया ऐकून व्हाल हैराण..

Ashish Vidyarthi | वयाच्या ६० व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: May 26, 2023 | 2:08 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक आशिष व‍िद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या ६० व्या वर्षी १० वर्ष लहान रुपाली बरुआ (Rupali Barua) हिच्यासोबत लग्न केलं आहे. रुपाली हिच्यासोबत आशिष विद्यार्थी यांचं दुसरं लग्न आहे.. आशिष आणि रुपाली यांनी लग्न मोठ्या थाटात नाही तर, अत्यंत साध्या पद्धतीत केलं. गुरुवारी आशिष आणि रुपाली यांनी त्यांच्या नात्याला पती-पत्नीचं नाव दिलं.. आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दुसरं लग्न केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.. सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त आशिष आणि रुपाली यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. रुपाली हिच्यासोबत लग्न केल्यानंतर आशिश विद्यार्थी यांनी भावना व्यक्त केल्या आहे..

दुसऱ्या लग्नाबद्दल आशिष विद्यार्थी म्हणाले, ‘आयु्ष्याच्या या टप्प्यात रुपाली हिच्यासोबत लग्न करणं माझ्यासाठी एक असामान्य अनुभव आहे… सकाळी आमचं कोर्ट मॅरेज झालं आहे… सध्यांकाळी छोट्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं.. आमची लव्हस्टोरी मोठी आहे… त्यामुळे नंतर सांगेल…’ नव्या आयुष्याला सुरुवात केल्यामुळे आशिष विद्यार्थी आनंदी आहेत..

एवढंच नाही तर, रुपाली बरुआ हिने देखील आशिष विद्यार्थी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. ‘काही दिवसांपूर्वी आमची भेट झाली.. त्यानंतर आम्ही आमच्या नात्याला नवं नाव देण्याचं ठरवलं. आमचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीत व्हावं अशी आमच्या दोघांची इच्छा होती..’ असं रुपाली म्हणाली..

गुरुवारी कोलकाता येथे पार पडलेल्या या लग्नात फक्त आशिष आणि रुपाली यांचं कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर आता हे कपल मित्र आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टी ठेवणार आहेत. आशिष यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, रुपाली आसाममधील फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथील रहिवासी रुपाली ही कोलकात्यातील एका फॅशन स्टोअरची मालकीण आहे.

आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, आशिष विद्यार्थी याचं पहिलं लग्न प्रसिद्ध अभिनेत्री शंकुतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआ यांच्यासोबत झालं होतं. पहिल्या लग्नानंतर वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे..

आशिष विद्यार्थी हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.. अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.. आशिष विद्यार्थी यांनी आतापर्यंत ११ भाषांमधील ३०० सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारात चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.. शिवाय आशिष विद्यार्थी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.