अंकिता लोखंडेचा ‘नो मेकअप’ लूक पाहून घाबरले नेटकरी; म्हणाले ‘हे तर भयानक’

सतत मेकअप आणि सुंदर रुपात दिसणाऱ्या सेलिब्रिटींना जेव्हा नो मेकअप लूकमध्ये पाहिलं जातं, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. काही कलाकार मेकअपशिवाय ओळखूच येत नाहीत. असंच काहीसं अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत घडलंय. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अंकिता लोखंडेचा नो मेकअप लूक पाहून घाबरले नेटकरी; म्हणाले हे तर भयानक
Ankita Lokhande
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 31, 2024 | 12:00 PM

मुंबई : 31 डिसेंबर 2024 | अभिनेत्री अंकिता लोखंडेनं ‘पवित्र रिश्ता’ या पहिल्यावहिल्या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या मालिकेत तिची सुशांत सिंह राजपूतसोबत चांगली जोडी जमली होती. अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही अंकिताचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे 52 लाख फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या अंकिताचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमधील तिचा नो मेकअप लूक पाहून नेटकरी अक्षरश: घाबरले आहेत. अंकिताला पहिल्यांदाच असं पाहिलं गेलं आहे. ‘हे तर खूपच भयानक’ असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अंकिताची खास मैत्रीण अशिता धवनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अशिताने पोस्ट केलेला अंकिताचा हा व्हिडीओ ‘बिग बॉस 17’च्या घरात जाण्यापूर्वीचा आहे. बिग बॉसमध्ये एण्ट्री करण्याच्या एक दिवस आधी अंकिताचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी तिला भेटायला आले होते. यावेळी त्यांनी केकसुद्धा कापला होता. याच पार्टीतील अंकिताचा व्हिडीओ अशिताने पोस्ट केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

पहा व्हिडीओ

‘भयानक’ असं एकाने लिहिल्यावर त्याला अशिताने उत्तरसुद्धा दिलं आहे. ‘हा शब्द एक महिलाच दुसऱ्या महिलेसाठी वापरू शकते. खूपच निराशाजनक आहे हे. हा व्हिडीओ अंकिता बिग बॉसच्या घरात जाण्याच्या एक दिवस आधी शूट करण्यात आला आहे. ती झोपायला जाणार होती आणि दुसऱ्या दिवसापासून तिच्या आयुष्याची नवी सुरुवात होती. जी व्यक्ती तिच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या इतक्या जवळची असेल, त्या व्यक्तीच्या मनात भावनांचा किती गोंधळ असेल याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही. त्या कुटुंबीयांना न भेटता, त्यांच्याशी न बोलता ती बिग बॉसच्या घरात राहणार आहे. हे सगळ्यात जास्त भयानक आहे’, असं तिने लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता कोणत्याही मेकअपशिवाय असल्याने तिच्या डोळ्यांखालील मोठी काळी वर्तुळे पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

अंकिता बिग बॉसच्या घरात टॉप 5 स्पर्धकांपर्यंत पोहोचली होती. चौथ्या स्थानी येऊन तिला हार पत्करावी लागली होती. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘बिग बॉस 17’चा विजेता ठरला आहे. तर अभिषेक कुमार या शोचा रनरअप ठरला आहे.