AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅलेंटेड गायिकेचं अवघ्या 44 व्या वर्षी निधन, दुर्धर आजाराशी झुंज संपली; दोन गाण्यांमुळं मिळालं स्टारडम

गायिकेच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का, वयाच्या 44 व्या घेतला शेवटचा श्वास, गायिकेला घेरलं होतं गंभीर आजाराने... गायिकेच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर

टॅलेंटेड गायिकेचं अवघ्या 44 व्या वर्षी निधन, दुर्धर आजाराशी झुंज संपली; दोन गाण्यांमुळं मिळालं स्टारडम
Gayatri Hazarika Instagram
| Updated on: May 17, 2025 | 12:55 PM
Share

संगीत विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिकेचं निधन झालं आहे. गायिकेच्या निधनानंतर कुटुंबासोबतच चाहत्यांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आसामी गायिका गायत्री हजारिका यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिकाचं निधन एका गंभीर आजाराने झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. तिच्या मृत्यूचे कारण कोलन कर्करोग असल्याचे सांगितले जात आहे.

गायत्री हिने आतापर्यंत अनेक गाणी गायली आहे. पण दोन गाण्यांमुळे तिच्या करीयरला एक वेगळी दिशा मिळाली. “ज़ोरा पाटे पाटे फागुन नामे” आणि “रति रति मोर ज़ून” या दोन गाण्यांमुळे गायत्री यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

गायत्री बऱ्याच काळापासून कोलन कर्करोगाशी झुंजत होती. गायिकेवर उपचार देखील सुरु होते. गुवाहाटीतील नेमकेअर रुग्णालयात उपचार सुरु असताना गायिकेने अखेरचा श्वास घेतला. गायत्रीचे संगोपन आसाममध्ये झाले, त्यामुळे ती तेथील लोकांना आवडती होती. ती मुख्य गायिका आणि लाईव्ह परफॉर्मर होती.

गायत्रीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गायिकेला श्रद्धांजली वाहिली आहेत. फार कमी लोकांना गायिकेच्या गंभीर आजाराबद्दल माहिती होतं. त्यामुळे गायिकेचं निधन आणि आजाराबद्दल कळल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे.

गायत्रीच्या मृत्यूची पुष्टी नेमकेअर हॉस्पिटलनेच केली आहे. गायत्रीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर 20000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. जे आता गायिकेच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर लोक गायिकेच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना दिसत आहेत. एक नेटकरी दुःख व्यक्त करत म्हणाला, गायत्री ही एक अतिशय प्रतिभावान गायिका होती जी या धोकादायक आजाराशी लढली. गायत्रीची गाणी अजूनही विंक म्युझिक आणि गाना सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल