हानिया आमिरचं असं कृत्य पाहून बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्याच्या चाहत्यांचा संताप अनावर, Video व्हायरल
Bachchan Family: हानिया आमिर हिने असं काय केलं ज्यामुळे ऐश्वर्या रायच्या चाहत्यांचा संताप झालाय अनावर, 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर बच्चन कुटुंबियांना देखील येईल राग... सध्या सर्वत्र हानिया आमिर हिचा व्हिडीओ व्हायरल

Bachchan Family: भारत – पाकिस्तान मध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान देशात गंभीर वातावरण आहे. ज्यामुळे भारतात पाकिस्तानी कलाकारांना बॅन केलं आहे. पण असं असताना देखील पाकिस्तानी कलाकारांमधील बॉलिवूडची क्रेझ कमी झालेली नाही. सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हानिया एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावावरून तिच्या मांजरीचं नाव ठेवते.
सांगायचं झालं तर, पाकिस्तानी कलाकारांना आता बॉलिवूडमध्ये कधीच काम मिळणार नाही असंच चित्र दिसत आहे. एवढंच नाही तर, भारतात पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडियावर अकाऊंट देखील ब्लॉक करण्यात आले आहेत. असं असताना देखील पाकिस्तानी कलाकारांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत.
आता पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर हिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये हानिया मांजरीला घरी आणते आणि तिचं नाव ऐश्वर्या असं ठेवते. हानियाची अशी वागणूक पाहून ऐश्वर्याच्या चाहत्यांना संताप अनावर झाला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये हानिया मांजरीला घरी आणते तेथे पाकिस्तानी अभिनेत्री यशमा देखील असते. याच दरम्यान दोघी अभिनेता संजय दत्त स्टारर ‘मुन्नाभाई एमबीएस’ सिनेमातील फेमस डायलॉग ‘और अपने मोहल्ले में ऐश्वर्या आई…’ असं म्हणतात. दोघींनी त्यांच्या मांजरीचं नाव ऐश्वर्या असं ठेवलं. ज्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
हानियाचा व्हिडीओ ऐश्वर्याच्या चाहत्यांना बिलकूल आवडला नाही. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही लोक जन्मालाही आला नव्हता, तेव्हा ऐश्वर्या मिस वर्ल्ड बनली होती आणि आजही ती जगातील सर्वात सुंदर आहे.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्याने स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर ओळख निर्माण केली आहे…’
‘बिचाऱ्या हानियाला बॉलिवूडमध्ये काम मिळत नाही म्हणून असं करते…’ भारताने दहशतवादाविरुद्ध यशस्वीरित्या ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर, अनेक पाकिस्तानी स्टार्स देशाविरुद्ध बोलू लागले.