AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Avatar 2: ‘अवतार 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या 3 दिवसांत छप्परफाड कमाई!

'अवतार 2'ची थक्क करणारी कमाई; तीन दिवसाचे आकडे पाहून डोळे विस्फारतील!

Avatar 2: 'अवतार 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या 3 दिवसांत छप्परफाड कमाई!
Avatar: the way of waterImage Credit source: Twitter
| Updated on: Dec 19, 2022 | 11:38 AM
Share

मुंबई: जेम्स कॅमरून दिग्दर्शित ‘अवतार 2’ हा हॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला पहिला भाग ‘अवतार’ हा 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागानेही कमाईचे विक्रम प्रस्थापित केले होते. आता दुसऱ्या भागानेही जगभरात छप्परफाड कमाई केली आहे. भारतातही या चित्रपटाची भरपूर क्रेझ आहे.

‘अवतार’ हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. 2009 मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा बॉक्स ऑफिसवर त्याने तुफान कमाई केली होती. 13 वर्षांनंतर प्रेक्षकांमध्ये सीक्वेल पाहण्याची उत्सुकता कायम आहे की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र अवतार 2 ने पहिल्याच दिवसापासून कमाल केली.

शुक्रवारी अवतार 2 ने तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता पहिल्या वीकेंडच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे पाहिल्यानंतर ‘अवतार 2’ बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचणार असल्याचं दिसतंय.

पहिल्या वीकेंडची कमाई

रविवारी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ने 46 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. तर शनिवारीही 45 कोटींहून अधिक गल्ला जमवला. त्यामुळे पहिल्या तीन दिवसांची कमाई 133 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ग्रॉस कलेक्शन म्हणजेच फक्त तिकिटांद्वारे झालेल्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास ‘अवतार 2’ने पहिल्या दोन दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला.

रविवारचं बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्टनुसार, चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन पहिल्या वीकेंडला 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. जगभरातील कमाईचा हाच आकडा 450 दशलक्ष डॉलर्सच्या जवळ गेला आहे.

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा जगभरातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन तीन अब्ज डॉलर्सच्या जवळ पोहोचलं होतं.

हॉलिवूड चित्रपटांची भारतातील ओपनिंग कमाई-

1- ॲव्हेंजर्स: एंड गेम- 53.10 कोटी रुपये 2- अवतार: द वे ऑफ वॉटर- 38 कोटी रुपये 3- स्पायडरमॅन: नो वे होम- 32.67 कोटी रुपये 4- ॲव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर- 31.30 कोटी रुपये 5- डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस- 27.50 कोटी रुपये

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.