RRR चित्रपटाला गे लव्ह स्टोरी म्हणणाऱ्या ऑस्कर विजेत्या कलाकारावर भडकले ‘बाहुबली’चे निर्माते, म्हणाले..

ऑस्कर विजेता साऊंड डिझायनर रेसुल पूकुट्टीच्या (Resul Pookutty) एका कमेंटने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. रेसुलने RRR या चित्रपटाच्या कथेला 'गे लव्ह स्टोरी' (Gay love story) असं म्हटलं आहे. त्याच्या या कमेंटवर 'बाहुबली' (Baahubali) या चित्रपटाचे निर्माते शोबू यार्लागड्डा यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

RRR चित्रपटाला गे लव्ह स्टोरी म्हणणाऱ्या  ऑस्कर विजेत्या कलाकारावर भडकले बाहुबलीचे निर्माते, म्हणाले..
RRR
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 05, 2022 | 11:45 AM

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने जगभरात तगडी कमाई केली. बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंतच्या कलाकारांनी या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं. अशातच ऑस्कर विजेता साऊंड डिझायनर रेसुल पूकुट्टीच्या (Resul Pookutty) एका कमेंटने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. रेसुलने RRR या चित्रपटाच्या कथेला ‘गे लव्ह स्टोरी’ (Gay love story) असं म्हटलं आहे. त्याच्या या कमेंटवर ‘बाहुबली’ (Baahubali) या चित्रपटाचे निर्माते शोबू यार्लागड्डा यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. एखादा कर्तृत्ववान व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो हे पाहणं निराशाजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय. राजामौलींच्या RRR या चित्रपटात रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920चा काळ दाखवण्यात आला असून अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन क्रांतीकारकांबद्दलची काल्पनिक कथा मांडण्यात आली आहे.

तब्बल 300 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात 1200 कोटींचा गल्ला जमवला आहे. अभिनेते आणि लेखक मुनिष भारद्वाज यांच्या ट्विटवर रिप्लाय देताना पूकुट्टीने RRR ला समलिंगी प्रेम कथा म्हटलंय. त्यावर उत्तर देताना बाहुबलीचे निर्माते शोबू यांनी ट्विट केलं, ‘मला नाही वाटत की RRR ही समलिंगी प्रेमकथा आहे, जसं तुम्ही म्हणालात. जरी ती गे लव्ह स्टोरी असली तरी त्यात काय वाईट आहे? त्यावर तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? तुमच्यासारखा कर्तृत्ववान व्यक्ती इतक्या खालच्या थराला जाऊन टीका करू शकतो, हे अत्यंत निराशाजनक आहे.’

शोबू यांचं सडेतोड उत्तर-

शोबू यांच्या ट्विटनंतर रेसुलने स्पष्टीकरण देताना म्हटलं की त्याने एका आर्टिकलमध्ये जे वाचलं तेच म्हटलंय. ‘तुमच्या मताशी मी सहमत आहे. गे लव्ह स्टोरी असली तरी त्यात काही चुकीचं नाही. मी फक्त माझ्या एका मित्राने पब्लिक डोमेनवर जे लिहिलं किंवा म्हटलं तेच सांगितलं आहे. यात खालच्या थराला जाणारी कोणतीच बाब नाही. शोबू, तुम्हाला हे गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मला कोणाच्याच भावना दुखवायच्या नव्हत्या’, असं त्याने लिहिलं.

रेसुलचं स्पष्टीकरण-

रेसुलने चित्रपटातील आलियाच्या भूमिकेवरही कमेंट केली. आलियाला फक्त प्रॉप (एक वस्तू) म्हणून वापरण्यात आल्याचं त्याने म्हटलं. याआधी दिलेल्या काही मुलाखतींमध्ये आलियाने तिच्या भूमिकेविषयी स्पष्टीकरण दिलं होतं. “माझी भूमिका लहान जरी असली तरी ती तितकीच महत्त्वाची आहे”, असं ती म्हणाली होती. ऑस्कर विजेता रेसुलने नंतर स्पष्ट केलं की तो केवळ आंतरराष्ट्रीय दर्शकांनी केलेल्या विधानांचा हवाला देत होता.