AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बजरंगी भाईजान’ फेम ‘मुन्नी’ची दहावीत उल्लेखनीय कामगिरी; मिळवले इतके टक्के

हर्षालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिचं कौतुक केलंय. इन्स्टाग्रामवर हर्षालीचे 34 लाख फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या हर्षालीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

'बजरंगी भाईजान' फेम 'मुन्नी'ची दहावीत उल्लेखनीय कामगिरी; मिळवले इतके टक्के
Harshaali MalhotraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 11:03 AM

अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात चिमुकल्या मुन्नीची भूमिका साकारणारी हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. हर्षाली इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. तिथे ती विविध फोटो आणि रिल्स पोस्ट करत असते. यावरून अनेकदा तिला ट्रोलसुद्धा केलं जातं. आता त्या ट्रोलर्सना हर्षालीने सडेतोड उत्तर दिलं आहे. दहावीच्या निकालातील टक्केवारी सांगत हर्षालीने टीका करणाऱ्यांचं तोंड बंद केलं आहे. नुकताच दहावीचा सीबीएसई बोर्डाचा निकाल लागला. त्यात हर्षालीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. निकालातील टक्केवारी सांगत हर्षालीने अभिनय, कथ्थक डान्स आणि अभ्यास या सर्वांत समतोल साधत असल्याचं म्हटलंय. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

या व्हिडीओमध्ये हर्षालीने तिला सतत येणाऱ्या कमेंट्सपैकी काही कमेंट्स दाखवले आहेत. ‘तू शाळेत तरी जातेस का?’, ‘तू दहावीत आहेस, अभ्यास कर नाहीतर नापास होशील’, ‘तू कथ्थकच शिकत बसशील तर दहावीत पास कशी होणार?’, ‘तू फक्त इन्स्टाग्राम रील्स बनवतेस का? अभ्यास करत नाहीस का?’ असे सर्व प्रश्न ती एकानंतर एक बाजूला सारते आणि त्यानंतर म्हणते, ‘तुम्ही सर्वांनी इतकी काळजी दाखवली, त्याबद्दल धन्यवाद. मी दहावीत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत 83 टक्के गुण मिळवले आहेत.’

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हर्षालीने लिहिलंय, ‘माझ्या मुद्रा अचूकपणे करण्यापासून ते शालेय शिक्षणात दमदार कामगिरी करेपर्यंत.. मी माझ्या कथ्थक क्लासेस, शूट्स आणि अभ्यास यात परफेक्ट समतोल साधतेय. या सर्वांचा रिझल्ट काय आला? तर 83 टक्के. कोण म्हणतं की तुम्ही तुमच्या रिल आणि रिअल आयुष्यात एकाच वेळी चांगलं काम करू शकत नाही? ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास केला आणि सतत मला पाठिंबा दिला, त्यांचे मी मनापासून आभार मानते.’ त्याचसोबत हर्षालीने तिच्या सर्व टीकाकारांचेही आभार मानले आहेत.

हर्षालीने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारली होती. त्यावेळी ती फक्त 7 वर्षांची होती. या चित्रपटात तिने सलमान खान, करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्यासोबत काम केलंय. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान हिट ठरला होता.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.