Batwara 1947 Box Office : सनी देओलला इम्रान हाश्मीचा झटका, ‘बंटवारा 1947’ ची संथ सुरूवात ! पहिल्या दिवशी कमावले अवघे…

सनी देओलच्या 'बंटवारा 1947' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी खूपच कमी कलेक्शन झाल्याने अपेक्षाभंग झाला. आमिर खान निर्मित आणि राजकुमार संतोषी दिग्दर्शित या बिग बजेट चित्रपटासमोर 'आवारापन 2' आणि 'स्पायडर मॅन' यांसारख्या चित्रपटांचे आव्हान आहे. सनी देओलच्या मोठ्या चाहत्यांवर्गामुळे जास्त कमाईची अपेक्षा होती, पण सद्यस्थिती पाहता चित्रपटाचे भवितव्य अनिश्चित दिसत आहे.

Batwara 1947 Box Office : सनी देओलला इम्रान हाश्मीचा झटका, ‘बंटवारा 1947’ ची संथ सुरूवात ! पहिल्या दिवशी कमावले अवघे...
‘बंटवारा 1947’ ने पहिल्या दिवशी किती केली कमाई ?
| Updated on: Aug 15, 2026 | 12:46 PM

Batwara 1947 Box Office : 2026 या वर्षाच्या सुरूवातीला सनी देओल (Sunny Deol) याचा एक चित्रपट रिलीज झाला होता, तो म्हणजे ‘बॉर्डर 2’. चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगला गल्ला कमावला. आता सनी देओल आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, त्याचं नाव म्हणजे ‘बंटवारा 1947’ (Batwara 1947_. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड कुतूहल आहे. सनी देओल, प्रीति झिंटा , शबाना आझमी यांच्यासह अनेकांच्या महत्वाच्या भूमिका असलेला हा चित्रपट पाहण्यास चाहतेही उत्सुक आहेत. या चित्रपटाचे जे रिव्ह्यू समोर आलेत, त्यानुसार पिक्चर तर खूप चांगला आहे, विशेषत: सनी देओल आणि शबाना आझमी यांच्या भूमिकेचं, कामाचं खूप कौतुक होत आहे. मात्र चित्रपटाचा पहिला भाग थोडा स्लो दिसतोय, एवढंच नव्हे तर चित्रपटातील बाकी कलाकारांची जादू देखील फारशी चाललेली नाही. ‘बंटवारा 1947’ चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन समोर आलं असून सुरूवात थोडी संथ झाली आहे. कारण पहिल्या दिवशी ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जेमतेम 5.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे मोठा अपेक्षाभंग झालाय.

सॅकनिल्कचा फायनल रिपोर्ट समोर आला असून सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’ काल एकूण 8721 शोज बूक झाले. तर 5.75 कोटींची कमाई हे नेट कलेक्शन आहे, भारतीय ग्रॉस कलेक्शन हे एकूण 6.84 कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर बाहेरच्या देशांमध्ये या चित्रपटाने जेमतेम 1.50 कोटी कमावले आहेत. संपूर्ण जगभरातून मिळून ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाने एकूण 8.34 कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी सनी देओलचा पिक्चर सहज 8-10 कोटी कमवेल असा ट्रेड्सचं म्हणणं होतं. मात्र संपूर्ण जगभरातूनही चित्रपटाची कमाई कही डबल डिजीट झालेली नाही, त्यामुळे हा सनी देओलच्या चित्रपटाला मोठा झटका मानला जात आहे.

सनी देओलचं मोठं नुकसान ?

खरंतर सध्या थिएटर्समध्ये दोन मोठे चित्रपट झळकले आहेत. पहिला तर इम्रान हाश्मी याचा ‘आवारापन 2’. जो सातत्याने चांगली कमाई करताना दिसत आहे, तर दुसरा पिक्चर म्हणजे ‘स्पायडर मॅन’. भारतीय चितक्रपट रिलीज झाल्यावर याचं कलेक्शन कमी झालं असलं तरी वीकेंडला त्याच्या कमाईत मोठी वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे हे सनी देओलच्या पिक्चरसाठी खूप धोकादायक ठरू शकंत. वीकेंडला बंटवारा 1947 चं कलेक्शन तर वाढलेत, असंही बोललं जात आहे. तरीही, पहिल्या दिवशी चित्रपटगृहांमधील उपस्थिती केवळ 15 टक्के इतकीच होती – विशेष म्हणजे सनी देओलचा प्रचंड चाहतावर्ग असूनही, एवढीच उपस्थिती होती. या चित्रपटाकडून सुरुवातीपासूनच मोठ्या अपेक्षा होत्या आणि सनी देओलच्या चित्रपटांना प्रेक्षकांचे नेहमीच भरभरून प्रेम मिळालं आहे. मात्र, असं असलं तरी यावेळी चित्र काहीसं वेगळंच दिसत आहे. एककीडे इम्रानच्या चित्रपटाने 21 कोटी रुपयांची कमाई केली, पण दुसरीकडे सनी पाजींचा चित्रपट मात्र केवळ 5-6 कोटी रुपयांच्या आसपासच घुटमळत राहिलाय.

‘बंटवारा 1947’ हा चित्रपट आमिर खानने प्रोड्यूस केला असून राजकुमार संतोषी यांनी तो दिग्दर्शित केला आहे. जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावर राजकुमार संतोषी आणि सनी देओल एकत्र येतात, तेव्हा बॉक्स ऑफीसवर नेहमी मोठी धमाल रंगते. या चित्रपटाचं बजेट 120-150 कोटी रुपये असून, आतचा पिक्चर हे बजेट कधी वसूल करेल , चांगली कामगिरी कधी करेल, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us