
आघाडीची अभिनेत्री असलेली आलिया भट्ट हि तिच्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहे, पण तिच्या अभिनयाचं नाणंदेखील खणखणीत वाजतं. तिने आत्तापर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं आहे, स्क्रीन शेअर केली आहे. शाहरूखसोबतही ती चित्रपटात झळकली. पण अभिनेता अक्षय कुमारसोबत देखील ती एका चित्रपटात दिसली होती. तुम्हाला माहीत आहे का नाव ? चला जाणून घेऊया.
बॉलिवूडचा खिलाडी स्टार अर्थात अभिनेता अक्षय कुमर याने त्याच्या 34 वर्षांच्या कारकिर्दित 150 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं आहे. दरवर्षी त्याचे चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होतात. या वर्षी त्याचे चार चित्रपट आधीच प्रदर्शित झाले आहेत. अक्षयने त्याच्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत काम केले आहे. तो बॉलिवूडची “डिंपल गर्ल” प्रीती झिंटासोबत मोठ्या पडद्यावरही दिसला आहे. पण याच चित्रपटात बॉलिवूडची आणखी एक डिंपल गर्ल आलिया भट्ट देखील दिसली होती. तो चित्रपट कोणता हे जाणून घेऊया.
ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी आलिया भट्टने 2012 साली ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तो काही तिचा पहिला चित्रपट नव्हता. ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. काही वर्षांपूर्वी, आलियाने बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणूनह काम केले होते.तिने अक्षय कुमार आणि प्रीती झिंटाच्या कोणत्या चित्रपटात काम केले होते?
अक्षय-प्रीतीच्या कोणत्या चित्रपटात झळकली आलिया भट्ट ?
बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करण्याच्या सुमारे 13 वर्ष आधी, आलिया भट्ट ही “संघर्ष” चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली. “संघर्ष” हा चित्रपट 3 सप्टेंबर 1999 रोजी प्रदर्शित झाला. त्यावेळी आलिया फक्त सहा वर्षांची होती. यामध्ये तिने प्रीती झिंटाची, लहानपणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन तनुजा चंद्रा यांनी केले होते आणि कथा आलियाचे वडील महेश भट्ट यांनी लिहिली होती.
बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद ?
संघर्षमध्ये अक्षयने प्रोफेसर अमन वर्मा यांची भूमिका केली होती, तर प्रीतीच्या पात्राचे नाव रीत ओबेरॉय असं होतं. या चित्रपटात आशुतोष राणाचीही प्रमुख भूमिका होती. तसेच विश्वजीत प्रधान, यश टोंक आणि मदन जैन सारखे कलाकार देखील होते. 26 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट 4 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने भारतात 6 कोटी रुपये आणि जगभरात 10.55 कोटी कमावले, ज्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर सरासरी यशस्वी झाला.
अक्षय कुमार आणि आलिया भट्टचं काम
19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या “जॉली एलएलबी 3” या चित्रपटाने भारतात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर आलिया भट्टच्या आगामी चित्रपटांमध्ये “अल्फा” आणि “लव्ह अँड वॉर” यांचा समावेश आहे.