मल्टिपल कार्डिॲक अरेस्टनंतर अभिनेत्री व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनक

| Updated on: Nov 17, 2022 | 7:53 AM

प्रसिद्ध अभिनेत्रीची मृत्यूशी झुंज; कॅन्सर, स्ट्रोकनंतर आता मल्टिपल कार्डिॲक अरेस्ट

मल्टिपल कार्डिॲक अरेस्टनंतर अभिनेत्री व्हेंटिलेटरवर; प्रकृती चिंताजनक
अँड्रिला शर्मा
Image Credit source: Instagram
Follow us on

कोलकाता: प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अँड्रिला शर्मा हिच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अँड्रिला सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतेय. मल्टिपल कार्डिॲक अरेस्टमुळे तिची प्रकृती नाजूक असल्याचं समजतंय. सध्या अँड्रिला व्हेंटिलेटरवर आहे. 15 नोव्हेंबर रोजी तिला मल्टिपल कार्डिॲक अरेस्टमुळे ताबडतोब कोलकातामधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात पोहोचताच तिला सीपीआर देण्यात आला. आता ती व्हेंटिलेटरवर असून प्रकृती नाजूक असल्याचं समजतंय.

अँड्रिलाने दोन वेळा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज दिली आहे. 1 नोव्हेंबर रोजी तिला ब्रेन स्ट्रोकसुद्धा झाला होता. यामुळे तिच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या होत्या. सध्या कोलकातामधील एका रुग्णालयात अँड्रिलावर उपचार सुरू आहेत. याआधी एक नाही तर दोन वेळा तिने कॅन्सरविरोधात यशस्वी झुंज दिली होती. सर्जरी आणि किमोथेरेपीनंतर तिची तब्येत ठीक झाली होती. मात्र आता पुन्हा तिची प्रकृती बिघडल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

अँड्रिलाने ‘झुमर’ या टीव्ही शोमधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. तिला खरी ओळख ही ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मिळाली. अँड्रिलाने कमी वयात इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि स्वत:ची वेगळी ओळख बनवली.

अभिनयक्षेत्रात काम करण्याचं अँड्रिलाचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप मेहतनदेखील घेतली. मात्र या प्रवासात तिला तिच्या आरोग्याची साथ मिळत नाहीये. अँड्रिलाच्या चाहत्यांनी तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तिच्यासाठी पोस्ट लिहिली आहे.

अँड्रिलाचा प्रियकर सब्यसाची चौधरी याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. सोशल मीडियावर अँड्रिलाच्या चाहत्यांनी तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.