AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाॅट मॅटर्निटी फोटोशूट शेअर करत ‘भाबीजी घर पर है’च्या गोरी मेमने प्रेग्नन्सीची केली घोषणा, विदिशाचा लूक पाहून उडाली लोकांची झोप

भाबीजी घर पर है ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत भाबीजी घर पर है मालिकेत गोरी मेमची भूमिका साकारणारी अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव ही प्रेग्नेंट असल्याची चर्चा सतत रंगत होती. आता मोठी घोषणा ही करण्यात आलीये.

हाॅट मॅटर्निटी फोटोशूट शेअर करत 'भाबीजी घर पर है'च्या गोरी मेमने प्रेग्नन्सीची केली घोषणा, विदिशाचा लूक पाहून उडाली लोकांची झोप
| Updated on: Jun 09, 2023 | 3:30 PM
Share

मुंबई : भाभीजी घर पर मालिकेमध्ये गोरी मेम अर्थात अनिता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव (Vidisha Srivastava) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. विदिशा श्रीवास्तव ही प्रेग्नेंट असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगत होती. मात्र, यावर भाष्य करणे हे विदिशा श्रीवास्तव हिने टाळले होते. चाहते देखील याबद्दल सतत विदिशा श्रीवास्तव हिला विचारत होते. विशेष म्हणजे भाभीजी घर पर है (Bhabiji Ghar Par Hai) मालिकेच्या माध्यमातून विदिशा श्रीवास्तव हिने प्रेक्षकांचे जबरदस्त असे मनोरंजन हे केले आहे. विदिशा श्रीवास्तव हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही देखील बघायला मिळते.

नुकताच विदिशा श्रीवास्तव हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत मोठी घोषणा केलीये. विदिशा श्रीवास्तव हिने खास फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे प्रेग्नसीच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे देखील विदिशा श्रीवास्तव हिने जाहिरे केले आहे. विदिशा श्रीवास्तव हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा लूक अत्यंत जबरदस्त असा दिसत आहे.

अनिता भाभीचा हा लूक पाहून नक्कीच विभूती नारायण यांना देखील घाम फुटला असेल. मॅटर्निटी फोटोशूट विदिशा श्रीवास्तव हिने केले आहे. लाल रंगाच्या साडीमध्ये हे फोटोशूट विदिशा श्रीवास्तव हिने केले आहे. या फोटोमध्ये विदिशा श्रीवास्तव ही बेबी बंप फ्लॉन्ट करताना देखील दिसत आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vidisha Srivastava

मॅटर्निटी फोटोशूटमध्येही कोणी इतके कसे बोल्ड दिसू शकते, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. विदिशा श्रीवास्तव हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा देखील चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच दावा करण्यात आला होता की, विदिशा श्रीवास्तव ही प्रेग्नेंट आहे. मात्र, त्यावेळी बोलणे विदिशा श्रीवास्तव हिने टाळले होते. यावर चाहते सतत विदिशा श्रीवास्तव हिला विचारत होते.

विदिशा श्रीवास्तव हिने तिच्या लग्नाची गोष्ट देखील बरीच वर्षे सर्वांपासून लपवून ठेवली होती. 2018 मध्ये विदिशा श्रीवास्तव हिने सायक पॉल याच्यासोबत बनारसमध्ये लग्न केले. सायक पॉल याच्या मनोरंजन क्षेत्राशी काहीच संबंध नाहीये. आता लवकरच सायक पॉल आणि विदिशा श्रीवास्तव हे आपल्या बाळाचे या जगात स्वागत करणार आहेत. विदिशा श्रीवास्तव हिचे हे फोटोशूट प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?