Bhagyaashreee Mote | ‘तुला मी कशी जाऊ देऊ?’, बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर भाग्यश्रीची भावूक पोस्ट

भाग्यश्रीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते तिला आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. 'तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याचं बळ मिळो', असं काहींनी म्हटलंय. तर अनेकांनी नेमकं काय झालं, असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

Bhagyaashreee Mote | 'तुला मी कशी जाऊ देऊ?', बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर भाग्यश्रीची भावूक पोस्ट
बहिणीसाठी भाग्यश्री मोटेची भावूक पोस्टImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 7:52 AM

पुणे : अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेयचा मृतदेह पिंपरी-चिंचवडमधील वाकड इथं आढळला होता. याप्रकरणी पोलिसांचा तपास आहे. बहिणीच्या मृत्यूनंतर भाग्यश्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावूक पोस्ट लिहिली आहे. मधू मार्कंडेयच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. मधू ही भाग्यश्रीची मोठी बहीण होती. वाकड परिसरात ती मैत्रिणीसोबत केक बनवण्याचा व्यवसाय करते. रविवारी मधू तिच्या मैत्रिणीसोबत भाडेतत्वावर रुम पाहण्यासाठी गेली होती. मात्र रुम पाहिल्यानंतर तिला अचानक चक्कर आली आणि दातखिळी बसली.

मधूच्या मैत्रिणीने तिला जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिथे तिचा उपचार होऊ शकला नाही. त्यानंतर तिला यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता, तपासानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मधूच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळल्याने काही घातपात झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत. मधूच्या कुटुंबीयांनीही हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

भाग्यश्रीची भावूक पोस्ट

बहिणीच्या निधनाने भाग्यश्री आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर बहिणीसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ‘तुला मी कशी जाऊ देऊ? तू माझ्या असण्याचा भाग आहेस. शांत झोप आता. बाकी तुझी बाळ सांभाळून घेईल,’ असं तिने एका फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

दुसऱ्या एका फोटोच्या कॅप्शनमध्ये भाग्यश्रीने लिहिलं, ‘माझ्या बहिणीने या जगाचा निरोप घेतला. माझ्यासाठी तुझं महत्त्व काय होतं हे मी शब्दांत मांडू शकत नाही. माझी आई, बहीण, मैत्रीण, माझा आत्मविश्वास आणि बरंच काही.. माझ्या विश्वाचं केंद्र तूच होतीस. तुझ्याशिवाय मी पूर्णपणे हरवून गेली आहे. तुझ्याशिवाय मी कसं जगू, हे तू मला शिकवलंस नाही. मृत्यू टाळता येत नाही, पण मी तुला जाऊ देणार नाही. कधीच नाही.’

भाग्यश्रीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते तिला आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याचं बळ मिळो’, असं काहींनी म्हटलंय. तर अनेकांनी नेमकं काय झालं, असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाग्यश्रीने ‘काय रे रास्कला’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.