Mahakumbh मध्ये का नाही जात भारती सिंग? म्हणाली, ‘बेशुद्ध होऊन मरण्यापेक्षा…’

Bharti Singh On Mahakumbh 2025: महाकुंभला जाण्याच्या प्रश्नावर कॉमेडी क्वीन भारती सिंहने असे उत्तर दिलं आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. भारती सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Mahakumbh मध्ये का नाही जात भारती सिंग? म्हणाली, बेशुद्ध होऊन मरण्यापेक्षा...
| Updated on: Feb 08, 2025 | 3:27 PM

Bharti Singh On Mahakumbh 2025: टीव्ही विश्वातील कॉमेडी क्वीन भारती सिंह कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता भारतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये भारती महाकुंभबद्दल बोलताना दिसत आहे. कॉमेडियन भारती सिंग स्पष्ट मत मांडताना दिसते. कोणत्याही विषयावर बोलण्यात ती अजिबात संकोच करत नाही. भारती तिच्या याच स्वभावामुळे अनेक ट्रोल देखील झाली आहे. आता देखील भारतीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

प्रयागराज येथील महाकुंभ 2025 ला देशभरातून आणि जगातून लोक संगमात श्रद्धेने स्नान करण्यासाठी येत आहेत. बॉलीवूडपासून ते टीव्ही स्टार्सपर्यंत अनेकजण संगमात स्नान करताना दिसले आहेत. पण नुकताच कॉमेडियन भारती सिंगला महाकुंभला जाण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पण भारतीने असं उत्तर दिलं, ज्यामुळे काही जण भारतीचं समर्थन करत आहेत, तर काही ट्रोल करत आहेत.

 

 

भारती सिंग नुकतीच पापाराझींसोबत बोलताना दिसली. यादरम्यान एका व्यक्तीने तिला प्रश्न विचारला, भारती जी, तुम्ही महाकुंभला जात नाही का? यावर भारती म्हणाली, ‘बेशुद्ध होऊन मरण्यासाठी की हरवण्यासाठी… मला महाकुंभला जायचं होतं. पण रोज हैराण करणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. अशात गोलासोबत जाणं शक्य नाही…’ असं भारती म्हणाली.

महत्त्वाची गोष्टी म्हणजे व्हिडीओचं कमेंट सेक्शन बंद करण्यात आलं आहे. पण अनेकांनी भारतीला ट्रोल केलं आहे. सध्या भारतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारती हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, भारती सध्या ‘लाफ्टरशेफ’ शोच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. हा शो भारती होस्ट करत आहे. ज्यामध्ये टीव्ही सेलिब्रिटी कुकिंग करताना दिसतात. ‘लाफ्टरशेफ’ शोचा पहिला सिझन हिट ठरला. त्यानंतर दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे.  भारती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.