Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बींची नात आणि सारा अली खान यांनी महिलांसाठी घेतलाय मोठा निर्णय, मिळून करत आहेत असं काम

Navya Nanda-Sara Ali Khan Collaboration: बिग बींची नात आणि सम्यक चक्रवर्ती यांनी 'निमाया' म्हणून नवा पाया रचला आहे. महिलांच्या आरोग्यावर विषेश लक्ष केंद्रित करणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये अभिनेत्री सारा अली खान देखील महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे.

बिग बींची नात आणि सारा अली खान यांनी महिलांसाठी घेतलाय मोठा निर्णय, मिळून करत आहेत असं काम
Follow us
| Updated on: Feb 08, 2025 | 1:11 PM

Navya Nanda-Sara Ali Khan Collaboration: महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि अभिनेत्री सारा अली खान यांनी मिळून महिलांसाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. सांगायचं झालं तर, नव्या नंदा आणि सम्यक चक्रवर्ती यांनी ‘निमाया’चा पाया रचला आहे. अभिनेत्री सारा अली खान हिला त्यांच्या फाउंडेशनची ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आलं आहे. तरुण महिलांना आर्थिकदृष्ट्या, भावनिक आणि सोशली सशक्त घडवण्यासाठी ‘निमाया’ची सुरुवात करण्यात आली आहे.

नव्या हिने ‘निमाया’ बद्दल सांगितलं की, ‘सम्यक आणि निमाया एकत्र काम करत आहे. ज्याचा संस्कृतमधून अर्थ ‘संधी’ असा आहे आणि मला असं वाटतं आम्ही तेच करत आहोत… सम्यक यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे आणि मी तरुणींसोबत खूप जवळून काम करत होती.

आम्ही कार्यक्रम तयार करण्यासाठी आमची आवड आणि कौशल्याचा वापर केला. ज्यामुळे अडथळ्यांना तोंड देणाऱ्या तरुण महिलांना त्यांच्यावर मात करण्याची संधी मिळेल.’ असं देखील नव्या नवेली म्हणाली.

‘निमाया’द्वारे ॲनिमियाबाबत केली जाणार जनजागृती

सम्यक चक्रवर्ती याआधी म्हणाला होता की, त्यांचा नवा प्रोजेक्ट ॲनिमियाबाबत जनजागृती निर्माण करण्यास मदत करेल. ‘या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही आता जवळपास 15 दशलक्ष इंप्रेशनवर पोहोचलो आहोत. ‘निमाया’ हा महिलांना सामर्थ्यवान बनविण्याविषयी आहे आणि आम्ही सशक्त स्त्रिया तयार करत आहोत.

सारा अली खान हिची महत्त्वाची भूमिका

नवीन नंदा आणि सम्यक चक्रवर्ती यांनी सारा अली खानला ‘निमाया’ची ब्रँड ॲम्बेसेडर बनवलं आहे. म्हणजेच महिलांचे आरोग्य, अशक्तपणा आणि त्यांच्या कौशल्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सारा या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.