Video: किस करु का?; भर कार्यक्रमात अभिनेत्याची विवाहित अभिनेत्रीकडे मागणी, सर्वच मर्यादा ओलांडल्या
Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने भर कार्यक्रमामध्ये विवाहीत अभिनेत्रीला मिठी मारून "किस करु का" अशी मागणी केली.

कलाकार हे कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिकांमुळे तर खासगी आयुष्यामुळे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने भर कार्यक्रमामध्ये विवाहीत अभिनेत्रीकडे नको ती मागणी केली. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी राग व्यक्त केला आहे.
आम्ही भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवच्या व्हिडीओविषयी बोलत आहोत. त्याचा एक स्टेज शो व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जनता त्याला स्टेजवर पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. मात्र खेसारीच्या शोमधील अश्लीलता पाहून कोणालाही लाज वाटेल. अभिनेत्याच्या अलीकडील शोचीच गोष्ट घ्या. खेसारीने स्टेजवर अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. इंटरनेटवर अभिनेत्याला ट्रोल केले जात आहे.
खेसारीने मर्यादा पार केली
शोमध्ये खेसारीसोबत भोजपुरी हसीना ऋतू सिंह दिसली. अभिनेत्री विवाहित आहे. तरीही विवाहित हिरोईनसोबत खेसारीने स्टेजवर मर्यादा ओलांडण्यात काहीही कसर सोडली नाही. खेसारीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये तो ऋतूसोबत स्टेजवर रोमँटिक होण्याचा प्रयत्न करताना दिसला. कधी तिच्या खूप जवळ येऊन टक लावून पाहू लागला तर कधी शर्टलेस होऊन ऋतूला मिठी मारली. शेकडो लोकांसमोर ऋतूसोबत तो जवळीक साधत होता.
एका व्हिडीओमध्ये तो ऋतूच्या इतका जवळ आला की वाटला किसच करेल. खेसारी इथेच थांबला नाही तर त्याने भरस्टेजवर ऋतूकडे किस करण्याची मागणीही केली. खेसारी म्हणाला, “मी चित्रपटात अनेकदा तिला किस केले आहे. तुम्ही लोकांनी ते पाहिले आहे ना? चित्रपटात घेतले तर बाहेर घेऊ शकत नाही का किस?” अभिनेत्याचे बोलणे ऐकून ऋतू सिंह चक्रावते. ती म्हणते, “अजिबात नाही.” यावर उत्तर देताना खेसारी म्हणाले की, “ठीक आहे मग घेणार नाही. जी देईल तिचे किस घेऊ.” स्टेजवर खेसारीने शर्ट काढला होता. त्याचा शर्टलेस अवतार सर्वांसमोर आला होता.
एका व्हायरल क्लिपमध्ये खेसारी अभिनेत्रीच्या एकदम घट्ट मिठी मारतो. बराच वेळ तो तिला मिठी मारतो. तो ऋतूला घट्ट पकडून बसतो. अभिनेत्री त्याला सोडायला सांगते. पण खेसारी म्हणजे खेसारीच, गर्दीत तो हिरोईनसोबत जवळीक साधत राहतो.
नेटकरी संतापले
खेसारीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने म्हटले की, “याच कारणाने भोजपुरी इंडस्ट्री बदनाम आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “ऋतूचा पती त्यांना काय म्हणेल?” युजर्स खेसारीबाबत नको नको त्या गोष्टी बोलत आहेत. अभिनेत्रीलाही अनेकांनी सुनावले आहे.