“स्वत: ला समजतोस कोण, असे 100 सलमान खान गल्ली झाडायला उभे करेन”

असले 100 सलमान मी गल्ली झाडायला उभे करेन. दुसरं कुणी मोठं होत असेल तर ते सलमानला बघवत नाही, असं बिचुकले म्हणाले आहेत. सलमान खान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे, असा संताप बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिचकुलेंनी व्यक्त केलाय.

स्वत: ला समजतोस कोण, असे 100 सलमान खान गल्ली झाडायला उभे करेन
सलमान खानला अभिजीत बिचुकले यांचा इशारा
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 3:01 PM

मुंबई : बिग बॉसच्या (Bigg Boss 15) घरातून बाहेर पडल्यानंतर कॉन्ट्रव्हर्सी किंग बिचुकले (abhijit bichukale) यांनी बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या (salman khan) विरोधात संताप व्यक्त केला आहे. असले 100 सलमान मी गल्ली झाडायला उभे करेन. दुसरं कुणी मोठं होत असेल तर ते सलमानला बघवत नाही, असं बिचुकले म्हणाले आहेत. सलमान खान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे, असा संताप बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर बिचकुलेंनी व्यक्त केलाय.

बिग बॉसचा 15 वा सिझन माझ्यामुळे चालला

सलमानला वाटतं की तो शो चालवतो पण तसं नाहीये. बिग बॉसचा 15 वा सिझन मी चालवला. काल वाघ पिंजऱ्यात होता आणि तो हंटर फिरवत होता. आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे. ‘सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईल की मी काय आहे’, असं म्हणत बिचुकलेंनी सलमानवर निशाणा साधलाय. ‘सलमान स्वतःला भाई समजतो पण त्यानेही लक्षात ठेवावं मी दादा आहे’, असंही ते म्हणालेत.

पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार

‘हिंदी बिग बॉसचा ग्रॅंड फिनाले होणार आहे म्हणून शांत आहे. एकदा ग्रँड फिनाले झाला की पत्रकार परिषद घेऊन मी खुलासा करेन’, असं बिचुकले म्हणाले. बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय हे जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

अभिजीत बिचुकले हे याआधी मराठी बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. त्यावेळीही त्यांनी केलेली विधानं चर्चेत होती. त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. सध्या ते बिगबॉस हिंदीमध्ये सहभागी झाले होते. नुकतेच ते बिगबॉसच्या घराबाहेर पडले आहेत. आता त्यांनी बिग बॉसचं घर आणि सलमान खानवर आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या

‘लॉ ऑफ लव्ह’ सिनेमा बघायला जा, टिकीट दाखवा आणि बुलेट घेऊन जा!, सिनेरसिकांसाठी अनोखी ऑफर

धर्मेंद्रला ट्रोलरने विचारला प्रश्न, आप पागल तो नहीं हो गए; यावर धर्मेंद्रचं मजेदार उत्तर

मल्याळम अभिनेत्रीचं लैंगिक शोषण प्रकरण : ट्रायल पूर्ण करण्यासाठी केरळ सरकारने वेळ वाढवून मागितली, मात्र न्यायालयाचा नकार

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.