रणवीर सिंहचा ’83’ इंग्रजीतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

| Updated on: Feb 01, 2021 | 1:33 PM

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मार्चमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक चित्रपटांची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

रणवीर सिंहचा 83 इंग्रजीतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
Follow us on

मुंबई : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मार्चमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक चित्रपटांची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्या होत्या. बिग बजेटच्या चित्रपटांना यामुळे फटका बसला आहे. आता चित्रपटगृहे पुर्ण क्षमतेसह उघडली आहेत. त्यानंतर, निर्मात्यांनी त्यांचा मोठा बजेटचे चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये आता एक नवीन बातमी पुढे आली आहे. रिलायन्स एंटरटेनमेंटचा ’83’ चित्रपट  इंग्रजीमध्येही प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. (Big news about Ranveer Singh’s film ’83’)

हा ’83’ चित्रपट होळीला प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. रणवीर सिंहचा हा चित्रपट ’83’ एप्रिल 2020 मध्ये रिलीज होणार होता पण लॉकडाऊनमुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली मात्र, अद्यापही चित्रपटाची रिलीजची नवीन तारीख समोर आलेली नाही. रिलायन्स एंटरटेनमेंटच्या हा एकच नव्हे तर दोन बिग बजेट चित्रपट रिलीजची वाट पहात आहेत. त्यामध्ये रणवीर सिंगची 83 आणि अक्षय कुमारचा सूर्यवंशी हे दोन चित्रपट आहेत.

या अगोदर होळीच्या निमित्ताने सूर्यवंशीच्या रिलीजचे नियोजन करण्यात आले होते, पण हॉलिवूड अ‍ॅक्शन चित्रपट गॉडजिला वर्सेज कॉन्ग रिलीजच्या तारखेमुळे गडबड झाली. रिलायन्स एंटरटेनमेंट 83 हा चित्रपट 1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या कहाणीवर आधारित आहे.
या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत.

83 चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने माजी भारतीय क्रिकेट कपिल देव म्हणूनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कपिल देवच्या पत्नीची भूमिका दीपिका पादुकोण साकारत आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात इतरही मोठे चेहेरे दिसणार आहेत.

संबंधित बातम्या : 

Vamika | विराट, अनुष्काच्या लेकीच्या नावाचा अर्थ माहितीय का? वाचा सविस्तर…

हंसल मेहता म्हणाले, सिमरन चित्रपट करणं ही माझी चूक; कंगना म्हणते “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का”

आजपासून चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु, बदलले हे नियम पाहा!

(Big news about Ranveer Singh’s film ’83’)