आजपासून चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु, बदलले हे नियम पाहा!

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी आजपासून दिली आहे.

आजपासून चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु, बदलले हे नियम पाहा!
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 11:35 AM

मुंबई : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी आजपासून दिली आहे. आता यानुसार देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 100 टक्के क्षमतेसह सुरू होणार आहेत. गृहमंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी ही माहिती दिली. त्यांनी यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचनाही जाहिर केल्या आहेत. चित्रपटगृहांना आणि प्रेक्षकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. दोन शो पूर्वीसारखे सतत चालणार नाहीत. (Cinema hall from today Starting at 100 percent capacity, but look at these rules)

दोन शो दरम्यान थोड्या वेळेचे अंतर ठेवावा लागेल. प्रकाश जावडेकर यांनी नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) विषयी माहिती दिली आणि ऑनलाईन तिकीट खरेदी करण्याचा सल्ला देखील दिला. चित्रपट बघायला येणारे लोक फूड स्टॉलमध्ये खाऊ-पिऊ शकतात. चित्रपटगृहांमध्ये स्वच्छता आणि कोविडच्या प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन करावे लागणार आहे. यासाठी चित्रपटगृहांच्या मालकांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

शो दरम्यान सर्वांना मास्क घालावे लागणार आहेत. चित्रपट बघायला येणाऱ्यांना आपला संपर्क क्रमांक देणे बंधनकारक आहे. जेणेकरुन गरज भासल्यास त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त, चित्रपट सुरू होण्यापूर्वी आणि नंतर, कोरोनाविषयी जागरुकता आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा संबंधित जाहिराती दखवण्यात येणार आहेत. चित्रपटगृहामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीतकमी 6 फूट अंतर राखणे बंधनकारक असेल, चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दोन्ही ठिकाणी सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे, चित्रपटगृहांच्या परिसरात थुंकण्यास कडक निषिद्ध

संबंधित बातम्या : 

Budget 2021 | निर्मला सीतारमण यांच्या पेटाऱ्यात मनोरंजन जगतासाठी काय?

शाहरुख-दीपिकापेक्षा मोठा झाला झाला जॉन अब्राहम? पठानच्या शूटिंगसाठी तारीखच देईना…!

हंसल मेहता म्हणाले, सिमरन चित्रपट करणं ही माझी चूक; कंगना म्हणते “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का”

(Cinema hall from today Starting at 100 percent capacity, but look at these rules)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.