AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हंसल मेहता म्हणाले, सिमरन चित्रपट करणं ही माझी चूक; कंगना म्हणते “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का”

2020 ची सर्वोत्कृष्ट वेब सीरिज तयार करणारे दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) आता चर्चेत आले आहेत.

हंसल मेहता म्हणाले, सिमरन चित्रपट करणं ही माझी चूक; कंगना म्हणते अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का
| Updated on: Feb 01, 2021 | 10:41 AM
Share

मुंबई : 2020 ची सर्वोत्कृष्ट वेब सीरिज तयार करणारे दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) आता चर्चेत आले आहेत. हंसल मेहता यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी चूक म्हणजे सिमरन या चित्रपटाची निर्मिती मी केली, असे हंसल मेहता यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. याच चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेली कंगना रनौतने आपला मोर्चा आता हंसल मेहता यांच्याकडे वळवला आहे. (Hansal Mehta tweeted that it was my mistake to make a Simran film)

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याविषयी बोलताना हंसल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, प्रत्येकजण आपल्या जीवनात चुका करतो, जसे मी सिमरन चित्रपट निर्माण करण्याची चूक केली.

हंसल मेहता यांच्या या ट्विटवर कंगनाने रिट्वीट करत म्हटले की, “हंसल सर त्यावेळी मी तुमच्यासोबत होते. तुमच्यासाठी मी त्या काळात उभी होते, परंतु आता तुम्ही असे म्हणता आहेत. यावर मला आता एक गाणे आठवते “अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का” असं म्हणत कंगनाने शेवटी हसणारा इमोजी शेअर केला आहे.

कंगनाच्या या ट्विटवर हंसल मेहता यांनी उत्तर दिले आहे की, हे ट्विट तुझ्यासाठी नव्हते आणि सिमरण चित्रपट रिलीज झाल्यानंतर मला खूप त्रास देण्यात आला होता. आणि त्यामुळे सिमरन चित्रपट तयार करणे ही माझ्या आयुष्यातील चूक आहे. आणि तु एक उत्तम अभिनेत्री आहेस तुझा मी सन्मान करतो. आता हंसल मेहता यांच्या ट्विटवर कंगना काय उत्तर देते हे बघण्यासारखे आहे.

संबंधित बातम्या : 

Budget 2021 | निर्मला सीतारमण यांच्या पेटाऱ्यात मनोरंजन जगतासाठी काय?

IMDB Rating : पाहा आयएमडीबी रेटिंगमध्ये कोणत्या वेबसीरिजचा जलवा

शाहरुख-दीपिकापेक्षा मोठा झाला झाला जॉन अब्राहम? पठानच्या शूटिंगसाठी तारीखच देईना…!

(Hansal Mehta tweeted that it was my mistake to make a Simran film)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली