AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vamika | विराट, अनुष्काच्या लेकीच्या नावाचा अर्थ माहितीय का? वाचा सविस्तर…

‘वामिका’ हे नावदेखील विराट आणि अनुष्का या दोन नावांचे एकत्रिकारण करून बनवण्यात आले आहे. मात्र, या नावाचा खास अर्थ देखील आहे.

Vamika | विराट, अनुष्काच्या लेकीच्या नावाचा अर्थ माहितीय का? वाचा सविस्तर...
विराट-अनुष्काच्या लेकीचं ‘वमिका’ नामकरण
| Updated on: Feb 01, 2021 | 1:17 PM
Share

मुंबई : गेल्या महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) ‘पालक’ बनले आहेत. त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. लेकीला कॅमेरापासून दूर ठेवणाऱ्या विरुष्काने आज (1 फेब्रुवारी) स्वतःहून त्यांच्या मुलीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच अनुष्काने त्यांच्या मुलीचे नावही जाहीर केले आहे. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे. ‘वामिका’ हे नावदेखील विराट आणि अनुष्का या दोन नावांचे एकत्रिकारण करून बनवण्यात आले आहे. मात्र, या नावाचा खास अर्थ देखील आहे (Virat and anushka’s Daughter Vamika Name meaning).

‘वमिका’ नावाचा ‘दुर्गा’देवीशी संबंध’

‘वमिका’ हे नाव जरी विराट आणि अनुष्का यांच्या नावातून तयार झाले असले, तरी याला एक खास अर्थ देखील आहे. वमिका अर्थात महादेवाच्या डाव्या बाजूला विराजमान असणारी देवी दुर्गा’. दुष्टांचा संहार करणारी देवी दुर्गा हे माता पार्वतीचे रूप आहे. याचाच अर्थ वमिका हे देखील दुर्गेचे एक रूप आहे. वमिका नावाची राशी वृषभ तर, ग्रह स्वामी शुक्र आहे. वमिका नावाचा दुसर अर्थ शिवाशी जोडलेला आहे. शिवाची शक्ती, तसेच देवी पार्वतीच्या उजव्या बाजूस विराजमान महादेव हे शक्तीचे स्वरूप आहेत.

या नावाशी संबंधित व्यक्तीच्या जीवनावर याचा प्रभाव देखील दिसून येत. या नावाच्या मुली अतिशय सुंदर आणि हुशार असतात. स्वच्छतेची आवड असणाऱ्या या मुलींचा कलात्मक क्षेत्राकडे ओढ असतो. म्हणजेच जर, भविष्यात अनुष्काच्या लेकीने तिच्या मार्गावर चालत मनोरंजन विश्वात येण्याचा निर्णय घेतला तर, नवल वाटणार नाही!(Virat and anushka’s Daughter Vamika Name meaning)

मीडिया आणि सोशल मीडियापासून अंतर राखणार!

अनुष्काने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ‘विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.’

बाळाचे संगोपनाची तयारी..

काही दिवसांपूर्वी अनुष्काने वोग (Vogue) या मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत बाळाच्या संगोपनाबाबतची माहिती दिली होती. मी प्रगतीशील कुटुंबातून आली आहे. जिथे लहान मुलांचे सर्व लाड पुरवले जातात. त्यासोबतच त्यांना इतरांचा आदर करण्यासही शिकवले जाते. तुम्हाला मुलांसाठी स्वत: हे स्ट्रक्चर तयार करावं लागेल. आम्हाला आमच्या मुलाला मस्तीखोर बनवायचं नाहीये. मी आई होण्यापूर्वीपासूनच याचा विचार करत होते, असे अनुष्का म्हणाली होती.

‘मुलगीच होणार’ भविष्यवाणी!

बंगळुरुच्या एका ज्योतिषीने सांगितले होते की, ‘विराट आणि अनुष्‍का पालक होण्याच्या अत्यंत रंजक प्रवासावर निघाले आहेत. त्यांचं पहिलं बाळ हे मुलगी असेल. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना पावर कपलमध्ये गणलं जातं. ज्योतिषशास्त्रीय कॅलक्युलेशन आणि फेस रिडिंगच्या आधारे विराट कोहलीला पहिली मुलगी होणार आहे’, असा दावा या ज्योतिषीने केला होता, जो अगदी खरा ठरला.

(Virat and anushka’s Daughter Vamika Name meaning)

हेही वाचा :

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.